मराठा संघटनांत एमपीएससी परीक्षेवरून एकमत नाही, संभाजी ब्रिगेड दोन्हीही छत्रपती यांच्या मागणी विरोधात..!

| पुणे | सरकारला वेठीस धरण्यासाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी दिली आहे. ते पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान वेळापत्रकानुसारच परीक्षा घ्यावी अशी मागणी करत संभाजी ब्रिगेड परीक्षा केंद्रांना संरक्षण देईल अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

जोपर्य़ंत मराठा आरक्षण मिळत नाही आणि यावर तोडगा निघत नाही. तोपर्यंत पोलीस भरती रद्द करावी आणि एमपीएससी परीक्षा घेऊ नये, अशी मराठा समाजाकडून मागणी होत आहे. दरम्यान, एमपीएससी विद्यार्थ्यांनी परीक्षा घेण्यात यावी, असे आवाहन केले आहे. आम्ही अभ्यास केला आहे. आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही. मात्र, आमचे वर्ष वाया जाईल, असे सांगत परीक्षा झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

दरम्यान प्रविण गायकवाड यांनी दोन्हीही छत्रपतींच्या विसंगत भूमिका घेतली आहे. त्यामुळे मराठा संघटनेत या वरून संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.