मुरबाड पंचायत समितीच्या शाळा सुरू करण्याच्या निर्णयावरून प्रशासन – संघटना आमनेसामने..!

| मुरबाड | कोविड-१९ (Covid-19) चा वाढता प्रादुर्भाव व लॉकडाऊनमुळे मुरबाड तालुक्यातील सर्वच शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान व हेळसांड होत आहे.

संपूर्ण बंदच्या काळात काही शिक्षकांनी शाळांकडे ढुंकूनही पाहिले नाही. फक्त मुख्याध्यापक शासनाला माहिती पुरविण्यासाठी तेवढे शाळा उघडत आहेत. संक्रमणाची भीती म्हणून विद्यार्थ्यांना शाळेत घेत नाहीत. परंतू आता तालुक्यात कोविड-१९ चा प्रादुर्भाव कमी होत आहे. मुरबाड तालुक्यातील १२६ ग्रामपंचायती पैकी ९६ ग्रामपंचायतीमध्ये कोविडचा प्रादुर्भाव दिसून आला नाही.

आदिवासी भागात कोरोनाचा प्रदुभाव दिसून न आल्याने त्याभागात शाळा सुरू करण्याबाबत श्रमिक मुक्ती संघटनेच्या इंदवी तुळपुळे यांनी सुद्धा प्रयत्न केला होता. त्यांच्या कार्यकर्त्यांनी शाळांवर जाऊन शिकविण्यास सुरुवात केली होती. कोविड१९ चा कमी होणारा प्रसार पाहता आमदार किसन कथोरे यांच्या पुढाकाराने व सभापती श्रीकांत धुमाळ यांच्या अथक प्रयत्नाने मुरबाड तालुक्यातील सर्व माध्यमाच्या शाळा लवकरात लवकर सुरू व्हाव्यात हे पंचायत समिती शिक्षण विभागाच्या विचारात होते. याबाबत पंचायत समितीने १४ ऑक्टोबर २०२० रोजी तसा ठराव घेतला आहे.

✓ घेतलेल्या ठरावानुसार निर्गमित केलेल्या परिपत्रकामध्ये शाळा स्तरावर मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामसेवक यांनी शाळा सुरू करण्याबाबत ठराव घेऊन निर्णय घ्यावा असे म्हटले आहे. कोविड१९ च्या प्रदीर्घ शाळा बंद नंतर शासन परिपत्रकानुसार शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेणारी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड पंचायत समिती ही पहिली पंचायत समिती आहे. आपल्या स्तरावरून तालुक्यातील शाळा सुरू करण्याबाबत प्रयत्नशील आहे. सदर निर्णयांमुळे व प्रयत्नांमुळे आमदार किसन कथोरे, सभापती श्रीकांत धुमाळ यांचे सर्व स्तरावरून कौतुक व अभिनंदन होत आहे.
– श्रीकांत धुमाळ, सभापती, पंचायत समिती मुरबाड

✓ ” शासनाकडून कोणतीही अशी अधिकृत भूमिका नसताना मुरबाड पंचायत समितीचा निर्णय आश्चर्यकारक आहे. पालकांचे हमीपत्र, शिक्षकांची जबाबदारी या मुळे वरकरणी पाहायला सोपे वाटत असले तरी जर कोणी बाधीत झाले आणि त्याने शाळेला ग्रासून, गावालाही ग्रासले तर याचे परिणाम गंभीर होणार आहेत. त्यामुळे पंचायत समितीने आततायी निर्णय घेऊ नयेत.

– शिक्षक संघटना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *