मुळशी तालुका शिक्षक पतसंस्था चेअरमनपदी श्री. रियाज शेख…

| पुणे / विनायक शिंदे I मुळशी तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी श्री. रियाज शेख , व्हाईस चेअरमनपदी श्री. रविंद्र चौधरी व मानद सचिव पदी सौ. सुनिता पवार यांची बिनविरोध निवड झाली.
मुळशी तालुका शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन श्री. हरिभाऊ वाघुलकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या चेअरमनपदी जि.प प्राथ. शाळा पिरंगुट येथे कार्यरत असलेले उपशिक्षक श्री. रियाज शेख यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. संस्थेच्या व्हाईस चेअरमनपदी श्री. रविंद्र चौधरी (शाळा बोतरवाडी) व मानद सचिवपदी सौ. सुनिता पवार ( शाळा नांदे) यांची निवड झाली.

या निवडप्रसंगी मुळशी तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष व माजी चेअरमन शहाजी मारणे, माजी चेअरमन हरिभाऊ वाघुलकर, माजी चेअरमन अविनाश टेमघरे, माजी चेअरमन आदिनाथ बोरकर, तालुका शिक्षक संघाचे कोषाध्यक्ष विपिन निकम, संस्थेचे कार्यकारी संचालक राजेंद्र भरम, तज्ञ संचालक शिवाजी चवले, संचालक यशवंत पासलकर , रविंद्र डोळसे, संतोष तायडे, शरद भापकर, नवनाथ झगडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *