| मुंबई | कोरोना विषाणूशी लढताना सर्वसामान्यांना चांगल्या दर्जाचे एन ९५ मास्क आजपासून किमान १९ ते ४९ रुपयांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने मास्कच्या किंमतीबाबत शासन निर्णय जारी केला आहे.
त्यामुळे राज्य सरकारने ठरवून दिलेल्या दरांप्रमाणेच दुकानदारांना एन ९५ मास्कची विक्री करावी लागणार आहे. आता मास्क जादा दराने विकल्यास दुकानदारांवर कठोर कारवाई होईल.
कोरोनाच्या संकटाचा फायदा घेत अनेक विक्रेत्यांनी मास्क व सॅनिटायझरची काळ्या बाजारात विक्री सुरू केली होती. मास्क अतिशय चढय़ा भावाने विकले जात होते. त्यामुळे मास्क व सॅनिटायझरच्या किंमती निश्चित करण्यासाठी राज्य सरकारने समिती नेमली होती. या किंमती निश्चित केल्यावर त्याचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे आजच्या तारखेपासून सरकारने ठरवून दिलेल्या दरानुसार विक्रेत्यांना मास्कची विक्री करावी लागेल. मास्कचा दर्जा व त्याची निश्चित केलेली कमाल विक्री किंमत दर्शनी भागावर लावणे आवश्यक राहील.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .