| नवी दिल्ली | नोकरी मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या देशभरातील तरुण-तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता वेगवेगळ्या नोकऱ्यांसाठी एकच सामायिक परिक्षा द्यावी लागणार आहे. नोकरीसाठी परीक्षा देणाऱ्या इच्छुक उमेदवारांचा ताण कमी व्हावा म्हणून National Recruitment Agency स्थापन करण्यात येणार आहे. त्याद्वारे एकच CET घेण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कॅबिनेट बैठकीत झालेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयाची माहिती दिली आहे.
शिक्षण झाल्यानंतर नोकरी मिळवण्यासाठी युवा पिढी अनेक मार्ग निवडते. प्रत्येक संस्था आणि कंपन्या आपापल्या परीक्षा ठेवतात आणि नोकरी मिळवण्याच्या हेतून तरुण या सगळ्या परीक्षा देतात. मात्र, इथून पुढे असे करण्याची गरज राहणार नाही. पंतप्रधान मोदी सरकारने घेतलेल्या एका ऐतिहासिक निर्णयामुळे हे चित्र पालटण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कॅबिनेट बैठकीत झालेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयाची माहिती दिली. आता सरकारी संस्थेत नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व इच्छुक उमेदवारांसाठी सामायिक परीक्षा असेल. त्यासाठी राष्ट्रीय भरती संस्था राष्ट्रीय भरती एजन्सी स्थापन करण्यात येणार आहे.
सरकारी संस्थेत नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व इच्छुक उमेदवारांसाठी सामायिक परीक्षा घेतली जाईल. त्यासाठी राष्ट्रीय भरती संस्था अर्थात National Recruitment Agency स्थापन करण्यात येणार आहे. या संस्थेत एकदा नोंदणी केली की एकच परीक्षा देऊन युवकांना आपली योग्यता सिद्धता करावी लागेल. नोकरीसाठी दारोदारी परीक्षा देत भटकण्याची वेळ युवा पिढीवर येणार नाही. प्रकाश जावेडकर यांनी यासंदर्भात माहिती देताना म्हणले, “युवकांना जागोजागी परीक्षा देण्यासाठी जावं लागू नये म्हणून एकच Common Eligibility test असेल. यात गुणवत्ता सिद्ध करुन उमेदवारांना पुढे जाण्याची संधी मिळू शकेल.”
आज कॅबिनेट मिटिंगमध्ये राष्ट्रीय भरती संस्था स्थापन करण्याखेरीज आणखी एक मोठा निर्णय झाला. देशातल्या सहा विमानतळांचं व्यवस्थापन आणि दैनंदिन व्यवहार खासगी संस्थेला देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. विमान प्रवाशांना अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्याच्या उद्देशाने हे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतल्याचं जावडेकर यांनी स्पष्ट केलं.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .