मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर ‘ या ‘ ही निकालात मंत्री एकनाथ शिंदे प्रथम वर्गातच..!

| मुंबई | शिक्षण घेण्यासाठी वय कधीच अडचण ठरत नाही, असे म्हटले जाते. इच्छाशक्ती असल्यास, व्यक्ती कोणत्याही वयात आपले शिक्षण पुर्ण करण्याचे स्वप्न पुर्ण करू शकते. याचेच उदाहरण राज्याचे नगरविकासमंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांसमोर ठेवले आहे.

प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे, किंवा प्रयत्नांती परमेश्वर या मराठीतील म्हणींचा प्रत्यय एकनाथ शिंदे यांच्या अथक आणि अविश्रांत मेहनतीच्या रूपातून पाहायला मिळतो. लहान वयातच घराची जबाबदारी खांद्यावर आल्याने श्री. शिंदे यांना एका मत्स्य वाहतूक व्यवसाय कंपनीत वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी नोकरीला सुरुवात करावी लागली. तत्कालीन बिकट आर्थिक परिस्थितीमुळे श्री. शिंदे यांना आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागले होते. पण शिक्षणाची जिद्द मात्र त्यांनी सोडली नव्हती. एकूणच परिस्थितीसमोर न झुकता, अखंड आणि अविश्रांत मेहनत घ्यायची तयारी आणि जिद्द उराशी बाळगली तर तुम्ही आयुष्यात यशस्वी होता हे त्यांच्या निकालातुन सिद्ध होतंय.

एकनाथ शिंदे कला शाखेतून 77.25 टक्के गुण घेऊन पदवीधर झाले आहेत. वयाच्या 56व्या वर्षी त्यांनी ही पदवी घेतली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या अंतिम वर्ष पदवी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे.

” लॉकडाउनच्या काळात दिवसभर कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजनांच्या शासकीय बैठका, विविध हॉस्पिटलमध्ये भेटी आणि दौरे करून घरी परतल्यानंतर श्री.शिंदे साहेब रात्री उशिरापर्यंत आपल्या पदवीच्या विषयांचा अभ्यास करत होते. दरम्यानच्या काळात श्री शिंदे साहेबांना कोरोनाने गाठले. पण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना आणि नंतर हॉस्पिटलमधून discharge झाल्यानंतर गावी तापोळा येथे विश्रांतीसाठी गेले असताना देखील श्री. शिंदे साहेबांनी या विश्रांतीच्या काळात देखील पदवी परिक्षांच्या विषयांच्या स्वतः नोट्स काढत अभ्यास करत असताना मी पाहिले. “

– खासदार डॉ श्रीकांत शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published.