महाराष्ट्राचे अनुकरण : शिवभोजन थाळी सारखी योजना या राज्याने केली सुरू..!

| जयपूर | ठाकरे सरकारने महाराष्ट्रात ज्याप्रकारे शिवभोजन योजना सुरु केली आहे. याच धर्तीवर राजस्थान सरकारने नवीन योजना आणली आहे. राज्यातील कोणाताही व्यक्ती जेवणापासून वंचित राहू नये यासाठी २० ऑगस्टपासून राजस्थानात इंदिरा रसोई योजना सुरु करण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी टोंक जिल्ह्यातून या योजनेचा शुभांरभ झाला.

टोंक जिल्ह्यातील ८ मोबाईल व्हॅन्सच्या माध्यमातून इंदिरा रसोई योजना सुरु करण्यात आली. या माध्यातून २ हजार ४०० लोकांना दररोजचं भोजन मिळेल. योजनेतंर्गत एका थाळीची किंमत ८ रुपये इतकी आहे. त्याचसोबत योजनेची योग्यरित्या अंमलबजावणी होण्यासाठी एका समितीचं गठन करण्यात आलं आहे. योजनेत सरकार समाजसेवी संस्थांनाही समाविष्ट करुन घेणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी गौरव अग्रवाल यांनी सांगितले.

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने ही योजना सुरु करण्यात येणार आहे. राज्यातील २१३ शहरात ३५८ किचनच्या माध्यमातून लोकांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. राज्यातील विविध शहरातील रेल्वे स्टेशन्स, बस स्टँड, हॉस्पिटलसारख्या प्रमुख ठिकाणी ही सुविधा सुरु असेल. जेवणाच्या थाळीत डाळ, चपाती, भाजी आणि लोणचं हे पदार्थ असणार आहेत. राज्य सरकार या योजनेसाठी १२ रुपये प्रतिथाळी अनुदान देणार आहे. योजनेचा दिवसाचा खर्च १.३४ लाख इतका आहे तर वषार्ला ४ कोटी ८७ लोकांना भोजन देण्याचा सरकारचा इरादा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.