महाराष्ट्रात ‘ इथे ‘ पुन्हा सुरू झाले भूकंपाचे धक्के, काल ४ रिश्टर स्केलच्या भूकंपासह २-३ भूकंपाचे धक्के..!

| पालघर | पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी परिसरात २०१८ पासून वारंवार भूकंपाचे शेकडो धक्के बसले आहेत. मध्यंतरी काही काळ भूकंपाचे धक्के जाणवले नव्हते त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र गेल्या महिनाभरापासून पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी आपलं डोकं वर काढलं आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण आहे.

काल रात्री १० वाजून ३३ मिनिटांनी २.८ , ११ वाजून ४१ मिनिटांनी ४.० तर १२ वाजून ०५ मिनिटांनी ३.६ असे रिश्टर स्केलचे धक्के बसले. डहाणू, तलासरी परिसराला भूकंपाचे जवळपास सात ते आठ हादरे बसले. हे धक्के तलासरी आणि डहाणू तालुक्यातील तलासरी, दापचरी, आंबोली, धानीवरी, ओसारविरा, कासा, बोर्डी, धुंदलवाडी, शिशने परिसरात जाणवले.

तलासरी पोलीस सध्या गावागावात गस्त घालत नागरिकांना धीर देण्याचा प्रयत्न करून पाहणी करत आहेत. कोरोना लॉकडाऊन काळात नागरिकांना भूकंपाने काहीसा दिलासा दिला होता. मात्र आज पुन्हा भूकंपाचा हादरा बसल्याने नागरिक पुन्हा भीतीच्या छायेखाली आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *