महाराष्ट्राला ऑक्टोबरने दिला दिलासा, कोरोनाचा आलेख उतरता..!

| मुंबई | कोरोनाशी झुंजणाऱ्या महाराष्ट्रासाठी ऑक्टोबर महिना हा दिलासा देणारा ठरला. या महिन्यात कोरोना वाढणारा आलेख उतरता दिसला. राज्यात शनिवारी 5548 नवीन रुग्णांची नोंद झाली. यासोबतच एकूण रुग्णसंख्या 16 लाख 78 हजार 406 झाली आहे. राज्यात सध्या 1 लाख 23 हजार 589 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 15 लाख 10 हजार 353 लोक कोरोनामुक्त झाले असून कोरोनामुक्तीचा दर 90 टक्क्यांवर गेला आहे.

शनिवारी राज्यात गेल्या 6 महिन्यातली सर्वात कमी (74) मृत्यूची नोंद झाली. आतापर्यंत एकूण 43 हजार 911 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांचा आलेख खाली येत आहे. मात्र सण-सुदीच्या काळात जास्त गर्दी झाली तर पुन्हा रुग्णसंख्या वाढू शकते असा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *