महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटनचा सावंत, वंजारी, पोकळे, भोयर यांना पाठींबा !

| पुणे : विनायक शिंदे | १ डिसेंबर रोजी होत असलेल्या विधान परिषदेच्या ५ जागांच्या निवडणूकीसाठी महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटनने मतदार संघानिहाय आघाडी व अपक्षांना पाठींबा जाहीर केला आहे.

विधान परिषदेची पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक प्रचार थंडावला आहे. पक्ष, संघटना यांनी आपल्या उमेदवाराचा प्रचार जोरात केला आहे. विविध उमेदवारांना विविध संघटना , मंडळ , संस्था , गटांनी पाठींबा जाहीर केले आहेत.

महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटन या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सरकारी / निमसरकारी कर्मचारी संघटनेने १ नोव्हेंबर २००५ नंतर च्या कर्मचाऱ्यांना जूनी पेन्शन लागू व्हावी या मुद्यावर प्रभावीपणे करण्याचे निश्चित केलेल्या उमेदवारांना पाठींबा जाहीर केला आहे.

पुणे शिक्षक मतदारसंघातून अपक्ष उमेदवार व विद्यमान आमदार दत्तात्रय सावंत यांना पाठींबा जाहीर केला आहे, अमरावती शिक्षक मतदारसंघामध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असलेल्या शिक्षक महासंघाच्या चंद्रशेखर उर्फ शेखर भोयर यांना पाठींबा जाहीर केला आहे.

नागपूर पदवीधर मतदार संघातून काँग्रेसचे महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी यांना महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटनने पाठींबा जाहीर केला आहे.
औरंगाबाद पदवीधर मतदार संघामध्ये अपक्ष उमेदवार रमेश पोकळे यांना जाहीर पाठींबा दिला आहे.

महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटनचे सर्व सभासद कर्मचारी पाठींबा जाहीर केलेल्या उमेदवाराच्या पाठीमागे ठामपणे उभे राहणार असल्याने प्रत्येक मतदारसंघात चुरस वाढली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *