महाराष्ट्र सरकार राबवत आहे #Thanks a teacher अभियान..!

| पुणे / विनायक शिंदे | समाजाच्या जडणघडणीमध्ये शिक्षकांचे कार्य महत्त्वपूर्ण आहे. ज्या शिक्षकांनी आपल्या आयुष्याला नवी दिशा दाखवली, आपल्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणले, ज्यांचे जीवन आपल्याला नेहमीच आदर्शवत वाटते अशा शिक्षकांचे “आभार ” व्यक्त करण्यासाठी शिक्षक दिनी Thank A Teacher अभियान राज्य शासनाच्या वतीने राबविले जाणार आहे.

कोविड१९ च्या प्रादूर्भावाच्या काळात शिक्षक, शिक्षण क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी शिक्षण देण्याव्यतिरिक्त “कोविड योध्दा” म्हणून विविध कामे पार पाडली उदा. तपासणी करणे, बाहेरून आलेल्या नागरिकांचे सर्वेक्षण करणे, विलगीकरण कक्षामध्ये निरीक्षक म्हणून व इतर अनेक कामे केली गेली त्यांच्या कामाचे कौतुक करण्यात यावे. आपल्या गुरूला त्याचे प्रती असलेल्या भावना व्यक्त करुन शब्दरूपी गुरुदक्षिणा द्यावी. #Thanks A Teacher या मोहिमेत समाजातील नामवंत व्यक्ती, कला, क्रीडा, साहित्य, सामाजिक , सांस्कृतिक संशोधन व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सहभागी व्हावे असे राज्य शासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

या दरम्यान विविध ऑनलाईन स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे, सदर अभियान ५ सप्टेंबर ते १० सप्टेंबर या कालावधी मध्ये आयोजित केले जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *