महविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये तब्बल साडे तीन तास महत्वाची बैठक संपन्न

| मुंबई | महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची सोमवारी रात्री महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत महाविकास आघाडीच्या नेत्यांची जवळपास साडेतास चर्चा झाली. ही बैठक संध्याकाळी सहा वाजता सुरु झाली होती. जवळपास साडेतीन तास विविध विषयांवरील चचेर्नंतर साडेनऊ वाजेच्या सुमारास ही बैठक संपली.

या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार ‘वर्षा’वर उपस्थित होते. काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री अनिल देशमुख आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण उपस्थित होते. त्याचबरोबर महाविकास आघाडीतील आणखी काही प्रमुख नेते या बैठकीत सहभागी झाले होते.

या बैठकीत राज्यातील प्रशासकीय अधिका-यांच्या बदल्या, राज्य सरकारचे काही महत्त्वाचे निर्णय, कोरोना संबंधित उपाययोजना यावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याचबरोबर अनिल देशमुख या बैठकीसाठी उपस्थित होते. त्यामुळे या बैठकीत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *