मोठी बातमी : केंद्रीय गृहमंत्री यांना कोरोनाची लागण

| नवी दिल्ली | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लागण झाल्याची बातमी खुद्द अमित शाह यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. करोनाची प्राथमिक लक्षणं दिसत असल्याने चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली. आता डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार अमित शाह रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेणार आहेत.

ट्विट करत त्यांनी म्हटलं की,, ‘करोनाची प्राथमिक लक्षणं दिसत असल्याने मी चाचणी केली असून रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी प्रकृती ठीक आहे.’ असं देखील ते म्हणाले.

शिवाय अमित शाह यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींना स्वतःची कोरोना चाचणी करण्याचे आवाहन केले आहे. त्याचप्रमाणे स्वतःला क्वारंटाईन करून घेण्याचा सल्ला देखील त्यांनी इतरांना दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.