” याच साठी केला होता अट्टाहास ” , बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे विधानसभेसाठी असू शकतात एनडीए चे अधिकृत उमेदवार..!

| पटना | सुशांत प्रकरणात हेतुपूर्वक महाराष्ट्र पोलिसांवर आगपाखड करणारे बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे आपल्या पदाचा राजीनामा देणार असून त्यांनी बिहार विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. अशा परिस्थितीत ते एनडीएचे उमेदवार बनू शकतात असे वृत्त आहे.

निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर गुप्तेश्वर पांडे राजीनामा देतील. सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात चर्चेत असणारे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी अभिनेताच्या मृत्यूबद्दल मुंबई पोलिसांच्या चौकशीवर अनेक प्रश्न उपस्थित केले होते.

दरम्यान, बिहारमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत समाजवादी पक्षाने बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. समाजवादी पक्षाने ट्वीट केले आहे की, समाजवादी पार्टी आगामी बिहार विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाशी युती करणार नसून राष्ट्रीय जनता दलाच्या उमेदवारांना पाठिंबा देईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *