यंदा थर्टी फर्स्ट साजरी करण्याचे प्लॅनिंग करण्याआधी वाचा हे..!

| मुंबई | 31 डिसेंबर यंदा घरातच साजरा करा अशी सूचना राज्याच्या गृहविभागाने दिली आहे. गृह विभागाने सोमवारी यासंदर्भात मार्गदर्शक सूचना संबंधित यंत्रणांना पाठविल्या आहेत. नव्या वर्षाचं स्वागत नागरिकांनी घरी थांबूनच अत्यंत साधेपणाने करावं. असे आवाहन गृह विभागाने केले आहे.

राज्यात 5 जानेवारीपर्यंत रात्री संचारबंदी लागू आहे. त्यामुळे गेटवे, मरिन ड्राइव्ह आदी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, अशी सूचनाही करण्यात आली आहे. कोणत्याही धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक मिरवणुका 31 डिसेंबरला काढता येणार नाहीत.

भारतात ही विविध राज्यांमध्ये काही निर्बंध लावण्यात आले आहेत. यामध्ये वर्षाच्या अखेरीस लोकांनी गर्दी करु नये म्हणून नियमावली जारी करण्यात आली आहे.

✓ मुंबईसह सर्व प्रमुख शहरांमध्ये महाराष्ट्रात सार्वजनिक ठिकाणी नवीन वर्षाच्या उत्सवावर बंदी घालण्यात आली आहे.

✓ 22 डिसेंबर ते 5 जानेवारी दरम्यान सकाळी 11 ते सकाळी 6 या वेळेत नाईट कर्फ्यू लागू आहे.

✓ सर्व अनावश्यक दुकाने आणि सेवा बंद राहतील.

✓ महाबळेश्वर पाचगणी या पर्यटनस्थळांमध्ये 31 डिसेंबरच्या रात्री 10 नंतर कोणतेही कार्यक्रम सुरू ठेवण्यास बंदी घालण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 144 कलमनुसार सातारा जिल्हाधिकारी यांनी आदेश काढले आहेत.

✓ हॉटेल व्यावसायिकांना देखील रात्री 11 पर्यंतच हॉटेल्स चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *