यूपीएससी परीक्षा : NDA / NA वेळापत्रक जाहीर

| नवी दिल्ली | केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) नॅशनल डिफेन्स अकॅडमी (एडीए) आणि नेव्हल अकॅडमी (एनए) परीक्षा (१) आणि (२) ची प्रवेशपत्रे (अ‍ॅडमिट कार्ड) ऑनलाइन जाहीर केली आहेत. एनडीएचे अ‍ॅडमिट कार्ड ‘युपीएससी डॉट गव्ह डॉट इन’ या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. परीक्षा देणारे उमेदवार ६ सप्टेंबरपर्यंत त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतील. यंदा केंद्रीय लोकसेवा आयोग एनडीए आणि एनएसाठी एकच सामायिक परीक्षा घेणार आहे, कारण मागील परीक्षा कोविड – १९ विषाणूच्या संक्रमण स्थितीमुळे घेण्यात आली नव्हती.

एनडीएच्या १४६ व्या कोर्ससाठी सैन्य, नौदल आणि वायूदलातील प्रवेश आणि २ जुलै २०२१ पासून सुरू होणा-या १०८ व्या भारतीय नौदल अकादमी कोर्ससाठी (आयएनएसी) सामायिक परीक्षा ६ सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे. यावर्षी ही एकच परीक्षा राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी (एनडीए) आणि नेव्हल अकॅडमी (एनए) मधील उमेदवारांच्या निवडीसाठी घेण्यात येणार आहे. या परीक्षेच्या माध्यमातून एकूण ४१३ पदांची भरती होणार आहे.

यूपीएससीने नोटीस जारी करत सांगितले होते की, ‘एनडीए आणि एनए परीक्षा (१) २०२०, १९ एप्रिल २०२० रोजी घेण्यात येणार होते, कोविड -१९ च्या संसगार्मुळे ती पुढे ढकलण्यात आले. आता एनडीए आणि एनए परीक्षा (१) आणि एनडीए आणि एनए परीक्षा (२) २०२० साठी ६ सप्टेंबर रोजी एक सामायिक परीक्षा घेण्यात येईल.

यूपीएससीची नागरी सेवा पूर्व परीक्षा ४ ऑक्टोबर २०२० रोजी घेण्यात येईल. पूर्व परीक्षेनंतर नागरी सेवेची मुख्य परीक्षा ८ जानेवारी २०२१ रोजी होईल. नागरी सेवा पूर्व परीक्षेसोबत भारतीय वन सेवा पूर्व परीक्षाही ४ ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *