युवकांनो, हे गुगलचे नवे ऍप देणार तुम्हाला जॉब..!

| मुंबई | आपल्याला इंटरनेटवर काही जरी शोधायचे झाले तरीही गुगलशिवाय सध्यातरी पर्याय नाहीय. गुगल हा प्रत्येकाच्या घरातील परिवाराचा एक भाग झाला आहे जणू..! कोणतीही वस्तू असेल की फोटो किंवा नोकरी तुम्हाला गुगलच त्या त्या संबंधित वेबसाईटची लिंक पुढ्यात आणून ठेवते. परंतू आता गुगल तुमची जॉब कन्सल्टन्सी होणार आहे. होय काहीसे असेच अ‍ॅप गुगलने भारतात लाँच केले आहे. ज्यावर कंपन्यांमध्ये असलेल्या नोकऱ्या थेट कळणार आहेत.

गुगलने कॉर्मो नावाचे अ‍ॅप लाँच केले आहे. हे असे अ‍ॅप आहे जे भारतातील करोडो बेरोजगारांना मदतगार ठरणार आहे. हे अ‍ॅप एन्ट्रीलेव्हल जॉब शोधण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

टेक क्रंचअनुसार गुगलने कॉर्मो जॉब्स हे अ‍ॅप पेमेंट सोल्यूशन गुगल पे मध्ये जॉब स्पॉटमध्ये जोडले आहे. भारतात हे अ‍ॅप जॉब स्पॉटच्या नावाने प्रसिद्ध केले जाणार आहे. महत्वाचे म्हणजे गुगलने हे अ‍ॅप भारताचा छोटा शेजारी बांग्लादेशमध्ये २०१८ मध्ये लाँच केले होते. यानंतर इंडोनेशियामध्येही लाँच केले होते. आता हे अ‍ॅप भारतात आणण्यात आले आहे.

कंपनीच्या दाव्यानुसार हे अ‍ॅप गुगल पेद्वारे उपलब्ध असून झोमॅटो, डुंजोसारख्या अनेक कंपन्यांनी यावर २० लाखांहून अधिक नोकऱ्या पोस्ट केल्या आहेत. एकंदरीत गुगल भारताच्या एका मोठ्या बेरोजगार युवकांसाठी आशादायी ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *