यश संदीप शेळके याची सातारा सैनिक स्कूल मध्ये निवड..!

| सोलापूर | सध्याच्या स्पर्धेच्या युगात आर्मी पब्लिक स्कूल पुणे गुणवत्तेत कुठेही कमी नाही आर्मी पब्लिक स्कूल पुणे चा विद्यार्थी यश संदीप शेळके याने अखिल भारतीय सैनिक स्कूल परीक्षेत घवघवीत यश संपादन केले असून त्याने सातारा सैनिक स्कूल मध्ये प्रवेश मिळवला आहे.

सातारा सैनिक स्कूल देशातील पहिले सैनिक स्कूल आहे भारत स्वतंत्र झाल्यानंतर देश संरक्षणासाठी सैन्यदलात सक्षम व कर्तुत्ववान अधिकारी तयार करण्यासाठी संपूर्ण भारतात प्रत्येक राज्यात एक याप्रमाणे सैनिक स्कूल ची स्थापना 23 जून 1961ला केली गेली
सैनिक स्कूल मधील विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश मिळवले आहे आयएएस आयपीएस व एनडीए यासह भारतीय सुरक्षा दलात उच्चपदावर या स्कूलमधील विद्यार्थी जाऊन पोहोचले आहेत

सैनिक स्कूल हुशार बुद्धिमान मुले स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून निवडून त्या मुलांना स्पर्धात्मक शिक्षण देऊन त्यांना फक्त पुस्तकी ज्ञान न देता त्यांना शारीरिक व मानसिक दृष्ट्या पण खंभीर बनवते अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पण ही मुले तावून-सुलाखून सुखरूप बाहेर येतील याप्रमाणे त्यांना प्रशिक्षित करते

यश संदीप शेळके यास आर्मी पब्लिक स्कूल च्या मुख्याध्यापक विनिता पुणेकर वर्गशिक्षिका निशिगंधा देविकर पुरुषोत्तम कोचिंग क्लासेसचे हर्ष दीक्षित सर आई सुरेखा शेळके व बहीण स्नेहा शेळके यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *