यूपीएससी मध्ये महाराष्ट्राचे अर्धशतक..! नेहा भोसले महाराष्ट्रात प्रथम

| मुंबई | केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) २०१९ मध्ये घेतलेला परीक्षेचा निकाल मंगळवारी सकाळी जाहीर झाला. यामध्ये एकूण ८२९ कँडिडेट्सची निवड करण्यात आली आहे. यात देशभरात प्रदीप सिंह हा देशातून अव्वल आला आहे. तर महाराष्ट्रात मुलीने बाजी मारली आहे. नेहा भोसले ही देशात पंधरावी तर महाराष्ट्रात प्रथम आली आहे.

सप्टेंबर, २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या लेखी परीक्षा आणि फेब्रुवारी-ऑगस्ट, २०२० मध्ये घेण्यात आलेल्या इंटरव्ह्यूच्या आधारावर आयोगाकडून मेरिट लिस्ट जारी करण्यात आली आहे. राज्यातील ५० पेक्षा अधिक जणांना या परिक्षेत यश मिळाले आहे. यात पहिली नेहा भोसले आहे.

यूपीएससीत यश मिळवणारे महाराष्ट्रातील विद्यार्थी :

नेहा भोसले (रँक 15 ), मंदार पत्की (रँक 22 ), आशुतोष कुलकर्णी (रँक 44), योगेश पाटील (रँक 63 ), विशाल नरवडे (रँक 91 ), राहुल चव्हाण (रँक 109), नेहा देसाई (रँक 137 ), कुलदीप जंगम (रँक 135 )(रँक ), जयंत मंकाळे (रँक 143 ),अभयसिंह देशमुख (रँक 151 ), सागर मिसाळ (रँक 204 ), माधव गित्ते (रँक 210), कुणाल चव्हाण (रँक 211), सचिन हिरेमठ (रँक 213), सुमित महाजन (रँक 214), अविनाश शिंदे (रँक 226), शंकर गिरी (रँक 230), श्रीकांत खांडेकर (रँक 231), योगेश कापसे (रँक 249), गौरी पुजारी (275), प्रसाद शिंदे (287), आदित्य काकडे (382) निमीश पाटील (389), मयांक स्वामी (393), महेश गिते (399), कांतीलाल पाटील (418) स्वप्नील पवार ( 448), ऋषिकेश देसाई (481), नवनाथ माने (527), प्रफुल्ल देसाई (532), विजयसिंहगराव गिते(550), समीर खोडे (551), सुरेश शिंदे (574), अभिनव इंगवले (624), प्रियंका कांबळे (670) निखील खरे (687), सौरभ व्हाटकर (695), अक्षय भोसले (704), अभिजीत सरकाते (710), प्रज्ञा खंदारे (719), संकेत धनवे (727), शशांक माने (743), निखील कांबळे (744), राहूल राठोड (745), सुमीत रामटेके (748), निलेश गायकवाड (752), कुणाल सरोटे (765), अभय सोनकर (767) वैभव वाघमारे (771), सुनील शिंदे (812), हेमंत नंदनवार (822), स्वरूप दीक्षित (827)

Leave a Reply

Your email address will not be published.