या अधिवेशनात ही आहेत मंजूर झालेली ९ विधेयके..!

| मुंबई | दोन दिवसांचे अधिवेशन नुकतेच संपन्न झाले. या अधिवेशनात विधिमंडळात ९ विधेयके मंजूर झाली.

ही आहेत ती विधेयके :

✓ सन 2020 चे विधानसभा विधेयत क्रं-54- महाराष्ट्र (तृतीय पुरवणी) विनियोजन विधेयक

✓ मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र महापालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा ) विधेयक 2020 : ( मुद्रांक शुल्कात केलेल्या कपातीप्रमाणे अधिभारामध्ये कपात करण्याची तरतूद करणे) ( नगरविकास)

✓ महाराष्ट्र सहकारी संस्था ( चौथी सुधारणा) : कोविडमुळे सहकारी संस्थांमधील महत्त्वाच्या विषयांना मंजुरी देण्यासाठी संचालक मंडळांना अधिकार देणेबाबतची तरतूद (सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभाग)

✓ महाराष्ट्र सहकारी संस्था- पाचवी सुधारणा : कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा 31 मार्च 2021 पर्यंत घेण्यास, लेखापरीक्षण अहवाल 31 डिसेंबर 2020 पर्यंत सादर करण्यासाठी वाढ करणे आणि गृहनिर्माण संस्थेच्या विद्यमान समितीचे संचालक हे नवीन संचालक मंडळ गठीत होईपर्यंत कामकाज पाहतील, अशी तरतूद करणे- सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभाग

✓ महाराष्ट्रात, महापालिका, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी सुधारणा : विधेयक, कोविडच्या पार्श्वभूमीवर नजीकच्या काळामध्ये निवडणुका न झालेल्या 12 नागरी स्थानिक संस्थामधील प्रशासकांच्या नियुक्तीच्या कालावधी 6 महिन्यांपर्यंत वाढवणे

✓ मुंबई महापालिका सुधारणा विधेयक : कोविड संसर्ग सार्वत्रिक साथ रोगामुळे सन 202-21 मध्ये मालमत्ता करातून सूट तसेच सवलत देण्याकरिता कलम 154 मध्ये पोट कलम 1ड नव्याने दाखल करण्याबाबत

✓ महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ – दुसरी सुधारणा : कोरोनामुळे नवीन महाविद्यालये, नवीन पाठ्यक्रम, विषय विद्याशाखा अतिरिक्त तुकडी इत्यादी सुरू करण्याची परवानगी कार्यपद्धतीचे सन 2020-21 या वर्षीकरिता नवीन वेळापत्रक विनिर्दिष्ट करणे – उच्च व तंत्र शिक्षण विभाग

✓ डी. वाय. पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ, तळसंदे कोल्हापूर विधेयक, 2020 स्वयं अर्थसहाय्य विद्यापीठ स्थापण करणे -उच्च व तंत्र शिक्षण विभाग

✓ महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ विधेयक, 2020 ( आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करणे ) शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग

Leave a Reply

Your email address will not be published.