या सिंघम आयपीएस अधिकाऱ्याचा भाजप मध्ये प्रवेश..!

| नवी दिल्ली | कर्नाटक मधील माजी आयपीएस अधिकारी अन्नामलाई कुप्पुसामी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दिल्ली येथील भाजप मुख्यालयात अण्णामलाई कुप्पुसामी यांनी पक्षाचे सरचिटणीस पी मुरलीधर राव आणि तामिळनाडूचे भाजप अध्यक्ष एल मुरगुन यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

कर्नाटकचे ‘सिंघम’ म्हणून ओळख असलेले माजी आयपीएस अन्नामलाई आपल्या धडक कार्यवाहीसाठी नेहमीच चर्चेत राहिले आहेत. या प्रवेशाबद्दल भाजपने ट्विट केले आहे की, “माजी आयपीएस अधिकारी अन्नामलाई कुप्पुसामी यांनी पी मुरलीधर राव आणि एल मुरगुन यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. अन्नामलाई कुप्पुसामी एक प्रामाणिक, शूर आणि सुप्रसिद्ध अधिकारी मानले जातात. त्यांच्या लोकप्रियतेमुळे जेव्हा त्यांची बदली उडुपी आणि चिक्कामगलुरू एसपी म्हणून झाली तेव्हाच स्थानिक लोकांनी त्याला विरोध केला होता.

दरम्यान, अन्नामलाई कुप्पुसामी यांनी २०१९ मध्ये पोलीस सेवेतून राजीनामा दिला होता. त्यांनी त्यावेळी राजकारणात येण्याबाबत काहीही सांगितले नसले तरी कर्नाटक सरकारचे गृहसचिव डी.रुपा म्हणाले की, त्यांनी राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. राजीनामा देण्याबाबत अन्नामलाई यांनी कोणतीही घोषणा केली नव्हती किंवा कोणत्याही राजकीय पक्षात जाणार याबाबत जाहीर केले नव्हते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *