राजकारणात फार काळ कुणी कुणाचा मित्र किंवा शत्रुही नसतो, गारगुंडी गावातील सत्कार समारंभात आमदार निलेश लंकेचे प्रतिपादन…

| पारनेर | राजकारणात फार काळ कुणी कुणाचा मित्र किंवा शत्रुही नसतो सांगत मी स्वता: खेळाडू असल्यानेच आमदार झालो आहे, मी कायमच मोठया पैलवानांसोबत कुस्ती केल्याचे सांगत त्यांनी माजी आमदार विजय औटी यांच्या केलेल्या दणकेबाज पराभवाची आठवण करून दिली. पारनेर तालुक्यातील गारगुंडी गावात आमदार निलेश लंके यांचा सन्मान सोहळा निलेश लंके प्रतिष्ठानचे बाळासाहेब ठुबे यांच्या पुढाकाराने संपन्न झाला, यावेळी आमदार निलेश लंके बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ठाणे जिल्हा शिक्षक सेनेचे अध्यक्ष सुनील शंकर फापाळे हे होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेर-नगर विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष अशोकराव सावंत, उद्योजक सुरेशशेठ धुरपते, वनकुटे गावचे सरपंच राहुल झावरे, कडूस गावचे सरपंच नाना मुंगसे, निलेश लंके प्रतिष्ठान मुंबईचे सचिव नितीन चिकणे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस पिंपळगाव रोठाचे सरपंच अशोक घुले, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा पूनम मुंगसे उपस्थित होते.

आमदार निलेश लंके पुढे बोलताना म्हणाले की, राजकारण हे बदलते असते पण त्याचा परिणाम दूरगामी होतो म्हणून येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये गावागावांत वादविवाद थांबवून सर्वांनी एकत्र बसून गावच्या ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्याचा प्रयत्न करावा, बिनविरोध निवडणुका झाल्या तर गावचा विकास वेगाने होईल व गावं आदर्श होण्यास मदत होईल. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन आपापल्या गावात नवीन बिनविरोध निवडणुकीची परंपरा सुरू करावी असे आवाहन अमादार निलेश लंके यांनी केले.

गारगुंडी गावचे माझ्यावर विशेष प्रेम आहे. माझ्या विधानसभा निवडणुकीचा अर्ज याच गावचे अपंग व्यक्ती त्र्यंबक झावरे यांनी भरला आहे. मला या गावाने गेल्या २० वर्षांपासून विशेष प्रेम दिले आहे. आता मला या गावाला काहीतरी द्यायचे आहे म्हणून मी आज आलो आहे असे आमदार लंके यावेळी म्हणाले. तसेच येणाऱ्या आर्थिक वर्षात माझ्या सर्व कामांपैकी पहिल्या विकासकामाचा नारळ या गारगुंडी गावात फोडणार असल्याचे प्रतिपादन आमदार लंके यांनी केले. तसेच भविष्यात गारगुंडी गावची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा असाही सल्ला दिला. त्यासोबतच तरुण मंडळींना गावाच्या विकासासाठी पुढे या असेही आवाहन केले. राजकारणात कोणीही कोणाचा जास्त काळ मित्र नसतो व शत्रूही नसतो असेही सूचक विधान केले.

आमदार लंके यांनी त्यांनी गेल्या एक वर्षांत केलेल्या कामांचा आढावा घेत भविष्यात करण्यात येणाऱ्या पुढील कामांविषयी माहिती दिली. महिला सक्षमीकरण करण्यासाठी आपण कटिबद्ध असून भाऊबीजेच्या मुहूर्तावर पारनेर तालुक्यातील महिला सक्षमीकरण करण्यासाठी कार्यालय उघडणार असल्याचे सांगितले. तसेच मतदार संघातील युवक सुदृढ करण्यासाठी व्यायामशाळा उघडणार असल्याचे सांगितले.

यावेळी गारगुंडी गावातील मारुती मंदिरासमोर सभामंडप देऊ असेही आश्वासन आमदार निलेश लंके यांनी दिले. गावाला जोडणाऱ्या रस्त्यांविषयी बोलताना टप्प्याटप्प्याने हे सर्व रस्ते आपण करू असे सांगितले. तसेच पालकमंत्री पाणंद रस्त्यांविषयी गावाने ग्रामपंचायत ठराव द्या आपण ते रस्ते करून देऊ असे सांगितले. गारगुंडी गावातील युवकांसाठी लवकरात लवकर आपण व्यायामशाळा मंजूर करून देऊ असेही आश्वासन आमदार लंके यांनी दिले. तसेच “गाव तिथे व्यायामशाळा” व “गाव तिथे तालीम” आपण उभारणार असल्याचे आमदार लंके यांनी यावेळी बोलताना सांगितले. तसेच गारगुंडी गावात ७ ते ८ हायमॅक्स पण आपण मंजूर करून देऊ असेही आमदार लंके यांनी सांगितले आहे. गावातील पाणीपुरवठा योजना काम लवकरच कार्यान्वित होईल असेही आश्वासन आमदार लंके यांनी दिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबासाहेब आमले यांनी केले, प्रास्ताविक बाबाजी फापाळे यांनी केले तर आभार माजी सरपंच अंकुश झावरे यांनी मानले. सत्यम निमसे, दत्ता कोरडे, दत्तात्रय भांड, विजय सासवडे, संतोष सोनावळे, बाळासाहेब खिलारी, पोपटराव पायमोडे, ठाणे-पालघर जिल्हा शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष शिक्षक नेते बाबाजी फापाळे, गारगुंडी गावचे माजी सरपंच बी.डी.झावरे सर, अंकुश झावरे, सौ.हिराबाई झावरे, झुंबराबाई ठुबे, वि.का.से.सो.विद्यमान चेअरमन सोपान झावरे, व्हा.चेअरमन दिनकर फापाळे, एल.के.झावरे, निलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब ठुबे, उपाध्यक्ष दिपक खोसे, निवृत्ती झावरे, अनिल कोरडे, हेमंत झावरे, अक्षय झावरे, रोहित झावरे, त्र्यंबकराव झावरे यांसह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी पत्रकार चाँद शेख यांचा जन्मदिवस देखील साजरा करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *