राज्यातील नवीन पेन्शन योजनेच्या प्रश्नांबाबत मंत्री व महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन यांच्यातील दुवा बनणार – राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख

| बीड | १ नोव्हेंबर २००५ नंतर शासकीय सेवेत नियुक्त झालेल्या कर्मचार्यांना DCPS योजना लागू करण्यात आली आहे. सध्या राज्यातील या योजनेत नियुक्त असणाऱ्या शिक्षण आस्थापनेत कार्यरत लाखो शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांना १५ वर्षे लागू असलेल्या परिभाषित अंशदायी पेन्शन योजना (DCPS) मधून राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (NPS) मध्ये रूपांतरित करण्याची प्रक्रिया करण्यात येत आहे. राज्यातील शिक्षक संवर्गाला अगोदरची DCPS योजनाच योग्य पद्धतीने लागू झालेली नाही, त्यात अनेक प्रकारची प्रशासकीय अनियमितता झालेली आहे, त्यामधील लेखी हिशोब विवरण पत्रे कर्मचार्यांना दिलेली नाहीत, शेकडो मयत कर्मचारी कुटुंबियांना कुठलाही लाभ मिळालेला नाही, नवीन NPS योजने बाबत कोणतीही स्पष्टता नाहीत यामुळे कर्मचारी संभ्रमात आहेत.

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेने या प्रक्रियेवर आक्षेप घेत विरोध केलेला आहे. कोरोना काळात मंत्रालयीन पाठपुराव्यात अडचणी येत आहेत. यावर मार्ग काढण्यासाठी युवक, बेरोजगारांच्या प्रश्नावर कायम आवाज उठविणारे, राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांची महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्यप्रवक्ते शिवाजी खुडे यांनी भेट घेतली. यावेळी राज्यातील या बाबतची संपूर्ण परिस्थितीची पुराव्यानिशी माहिती महेबूब शेख यांना संघटनेच्या वतीने देण्यात आली. यावर त्यांनी मंत्रालयीन पातळीवर लगेच फोन द्वारे संपर्क साधून मंत्री जयंत पाटील साहेब यांच्याशी स्वतः व शिवाजी खुडे यांचे प्रत्यक्ष बोलणे करून दिले. मंत्री जयंत पाटील यांनी फोन द्वारे विषय समजून घेतला आहे व चालू असलेल्या प्रक्रियेबाबत उद्या शालेय शिक्षण विभागाला बोलतो असे सांगितले आहे.

महेबूब शेख यांनी दोन तास या संपूर्ण विषयाविषयी सर्व माहिती जाणून घेऊन आपला विषय माझ्या लक्षात आला आहे. NPS खाते उघडण्यासाठी चालू असलेली CSRF फॉर्म भरण्याची प्रक्रिया शिक्षण उपसचिव यांनी २८ जुलै २०२० रोजी शिक्षण आयुक्तांना दिलेल्या निर्देशानुसार करण्याबाबत उद्या शिक्षण आयुक्त यांना बोलतो. तसेच या बाबत आपले म्हणणे मंत्रालयीन पातळीवर मांडण्यासाठी संघटनेची सविस्तर बैठक येत्या १५ दिवसात वरिष्ठ मंत्री जयंत पाटील साहेब, अजित दादा पवार साहेब यांच्या सोबत घेण्याबाबत व संघटनेला वेळ मिळवून देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतो असे मेहबूब शेख यांनी यावेळी स्पष्ट सांगितले आहे. तरुणांबद्दल कायम आवाज उठविणाऱ्या युवक प्रदेशाध्यक्षानीं राज्यातील 5 लाखांवरील युवा कर्मचारी आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या 25 लाखांवरील कुटुंबियांवर परिणाम करणारा हा विषय आस्थेवाईकपणे समजून घेतल्याबद्दल संघटनेने प्रदेशाध्यक्ष मेेहबूब शेख यांचे आभार मानले असल्याचे राज्य प्रवक्ते शिवाजी खुडे यांनी सांगितले आहे.

राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांच्या सूचनेवरून राज्यप्रवक्ते शिवाजी खुडे यांनी ही भेट घेतली. यावेळी संघटनेचे शिरूर तालुकाध्यक्ष विकास खेडकर, सुनील वारे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *