राज्यस्तरीय आदर्श आरोग्य सेवक पुरस्काराने संजय सोनार यांचा गौरव..

| जळगाव | मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी, मुंबई यांच्या वतीने राज्यस्तरीय गुणिजन गौरव महासंम्मेलन २०२० अंतर्गत जिल्ह्यातील गोंडगाव ता.भडगाव येथील आरोग्य सेवक संजय सोनार कळवाडीकर यांना राज्यस्तरीय आदर्श आरोग्य सेवक म्हणून गौरविण्यात आले.

सोनार हे आरोग्य सेवक म्हणून करीत असलेल्या कार्याचा योग्य सन्मान झाला असुन आरोग्य विभागामार्फत येणाऱ्या प्रत्येक मोहीमांमध्ये सक्रिय सहभागी होऊन आरोग्य सेवा देत असतात. पोलिओ मोहीम, डेंग्यु, मिशन इंद्रधनुष्य, गोवर-रुबेला यांची जनजागृती रांगोळीच्या माध्यमातुन करीत असतात. तसेच महाराष्ट्र शासनाच्या येणाऱ्या विविध मोहीमांची माहीती सोशल मिडीया द्वारे नागरिकांपर्यत पोहचविण्याचे कार्य करीत असतात.

गेल्या २२ मार्च पासून कोरोना काळात त्यांनी केलेले कार्य वाखणण्याजोगे आहे. सुरवातीच्या काळात कोरोनाची जनजागृती करतांना भडगाव तालुक्यातील जवळजवळ ३४ गावांमध्ये ध्वनीक्षेपकाव्दारे जनजागृती केली. आपल्या कार्यक्षेत्रात नागरिकांनी वारंवार हात साबणाने धुवावे, सोशल डिस्टन्सच्या नियमांचे पालन करावे, मास्कचा नियमित वापर करावा, याबाबतीत नेहमी जनजागृती करीत असतात.

सदर पुरस्काराबाबत बोलतांना सोनार यांनी सांगितले की, आरोग्य सेवक म्हणुन आम्ही केलेल्या कार्याचा सन्मान म्हणुन आम्हांला अनेकांनी कोरोना योध्दा म्हणुन गौरव केलेला आहे. पण मी स्वतःला कोरोना योध्दा मानत नाही. ज्या दिवशी जगातुन कोरोना हा आजार समुळ नष्ट होईल. त्या दिवशी आपण सर्वांनी घेतलेली मेहनत कामी येईल आणि त्या दिवशी आम्ही खरे कोरोना योध्दे ठरु. कोरोनाकाळात नागरिकांनी केलेल्या सहकार्याबाबत सोनार यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *