
| इंदापूर/ महादेव बंडगर | भिगवण रोटरी क्लब च्या वतीने कोरोना महामारीच्या काळातही अविरत जनसेवेत असणाऱ्या भिगवण पोलीस स्टेशन, प्राथमिक आरोग्य केंद्र, पोस्ट ऑफिस तसेच भिगवण, तक्रारवाडी, मदनवाडी आदी ग्रामपंचायतींना आज बुधवार दि. २१ ऑक्टोबर रोजी “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” या उपक्रमाच्या माध्यमातून होत असलेल्या विविध सर्वेक्षण मोहिमांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने काम करणारे कर्मचारी व पोलीस स्टेशनच्या माध्यमातून कोरोना योध्याची भूमिका पार पाडणाऱ्या पोलिसांच्या कामाची दखल घेत त्यांना N-95 मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले .
तसेच परिसरातील भिगवण तक्रारवाडी, मदनवाडी गावच्या ग्रामपंचायतींनाही या वस्तूंचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी डॉ.पवार, डॉ. मृदुला जगताप, सहायक पोलिस निरीक्षक जीवन माने साहेब, संतोष धवडे, आम्रपाली बंडगर,तेजस देवकाते, रोटरीचे अध्यक्ष संपत बंडगर, सचिन बोगावत, रियाज शेख, प्रदीप वाकसे, रणजित भोंगळे, प्रविण वाघ, संजय खाडे, कमलेश गांधी, औदुंबर हुलगे, कुलदीप ननवरे, संतोष सवाने उपस्थित होते.
भिगवण रोटरी क्लब परिसरातील ग्रामस्थांच्या अडीअडचणी लक्षात घेऊन सातत्याने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत आहे. रोटरीच्या वतीने विविध शाळांमध्ये तसेच शिक्षण संस्थांना विद्यार्थ्यांच्या संगणकाच्या मदतीने तंत्रस्नेही बनवण्यासाठी 100 ई-लर्निंग संच देण्यात येणार आहेत. त्यासाठी इच्छुकांनी रोटरीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन अध्यक्ष संपत बंडगर यांनी केले आहे.
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री