| कोल्हापूर | कोरोनाच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर रुग्णाना उपचारास साह्य होण्यासाठी राधानगरी तालुका जुनी पेन्शन हक्क संघटने कडून आज राधानगरी तालुका covid 19 सेंटरला तब्बल सात जंबो ऑक्सीजन सिलेंडर प्रदान करण्यात आले आहेत.
शिक्षक हा पथदर्शक आणि मार्गदर्शक असतो. आज युवा शिक्षकांच्या संघटनेकडून घेतलेल्या सहकार्याच्या भूमिकेचे शिक्षण विभागासह सर्व अधिकारी, पदाधिकारी कौतुक करत आहेत. “आजघडीला कोरोना रुग्णांसाठी सर्वात महत्वाचे काय असेल तर तो आहे प्राणवायू आणि तो आपल्या कडून मिळत आहे,” अशा शब्दात गटविकास अधिकाऱ्यांनी संघटनचे आभार व्यक्त केले.
या अगोदर देखील राधानगरी तालुका जूनी पेन्शन हक्क संघटनच्या वतीने मयत कर्मचाऱ्यांचा कुटुंबियांना सहकार्य, पूरग्रस्तांना सहकार्य, रक्तदान शिबिर, शिक्षण मंथन शिबीर असे अनेक सामाजिक उपक्रम घेत सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम संघटन कडून होत आहे.
शाहू महाराजांच्या संस्काराने पावन झालेल्या राधानगरीच्या भूमीत दातृत्व आणि कर्तृत्व हा आपल्या मातीचा संस्कृतीचा वारसा जोपासण्याचं महत्वपूर्ण काम पेन्शन हक्क संघटन कडून केले जात आहे.
राधानगरी covid19 सेंटरला सात ऑक्सीजन सिलेंडर प्रदान केल्यामुळे अत्यावश्यक रुग्णांना याचा निश्चित लाभ होणार आहे. गरजू रुग्णांना प्राणवायू देण्यासाठी देण्याचे निमित्त ठरत असल्याने अत्यंत समाधान मिळत आहे, अशी भावना सहकार्य करणाऱ्या प्रत्येक शिक्षकाच्या मनात आहे. संघटनचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
याप्रसंगी पंचायत समिती सभापती सुशीला भावके , उपसभापती मोहन पाटील, गट विकास अधिकारी संदीप भंडारी , गटशिक्षणाधिकारी आर .आर. कुंभार, आरोग्य अधिकारी शेट्टी आदी अधिकारी – पदाधिकारी उपस्थित होते. तसेच कोल्हापूर जिल्हा जूनी पेन्शन हक्क संघटन जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे, तालुकाध्यक्ष बाजीराव पाटील, रणजीत जठार, प्रमोद पाटील, सागर पाटील, गिरीश प्रभू, प्रशांत राणे, सुनील पाटील, राहुल पाटील, नामदेव निकम, विजय पाटील,संतोष फड, संतोष वाईंगडे, उद्धव लांडे, सुरेश चांदम, सदानंद मांडरे,वासुदेव डिगे, सुभाष गोरुले आदी संघटनेच्या वतीने उपस्थित होते.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .