रिया चक्रवतीला विचारले जाणार हे १० प्रश्न

| मुंबई | सिने अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआयकडून अभिनेत्री रिया चक्रवर्तीची चौकशी केली जात आहे. एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, नुपूर प्रसाद रिया चक्रवर्तीचा जबाब नोंदवणार आहेत. सुशांत सिंहच्या कुटुंबाने रिया चक्रवर्तीवर केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी करत आहेत. रियाने सुशांतला मानसिक त्रास दिल्याचा तसंच आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे. सूत्रांनुसार रियाला सीबीआयकडून १० प्रश्न विचारले जाणार आहेत. जाणून घेऊयात हे प्रश्न.

१) सुशांतच्या मृत्यूची माहिती तुला कोणी दिली ? त्यावेळी तू कुठे होतीस ?

२) मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर सुशांतच्या वांद्रे येथील घरी गेली होतीस का ? जर नाही तर मग मृतदेह कधी आणि कुठे पाहिला ?

३) ८ जून रोजी सुशांतचं घऱ का सोडलं ?

४) भांडणानंतर सुशांतचं घऱ सोडलं होतं का ?

५) सुशांतचं घर सोडल्यानंतर तुझ्यात आणि सुशांतमध्ये ९ जून ते १४ जून दरम्यान काही संभाषण झालं का ? जर हो तर कधी आणि कोणत्या विषयावर ? नाही तर मग का ?

६) सुशांतने तुझ्याशी संपर्क साधण्याचा कोणता प्रयत्न केला का ? त्याचा फोन आणि मेसेजकडे दुर्लक्ष करत होतीस का ? जर हो तर का ? त्याचे कॉल ब्लॉक का केले होते ?

७) तुझ्या कुटुंबातील कोणाला सुशांतने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.?

८) सुशांतला असणाऱ्या आरोग्याशी संबंधित समस्या तसंच घेत असलेल्या उपचारांची माहिती. डॉक्टर, मानसोपचारतज्ञ आणि औषधांची माहिती.

९) सुशांत च्या कुटुंबासोबत संबंध कसे होते.?

१०) सीबीआय चौकशीची मागणी का केली..? तुला षडयंत्र असल्याची शंका आहे का.?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *