रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्स मध्ये मोठी घसरण, १.१२ लाख कोटींची घसरण..!

| नवी दिल्ली | सोमवारी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये 8 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली. रिलायन्सच्या शेअर्सच्या भावात घसरण होऊन ते 1890 रुपये इतके खाली आले. दुसऱ्या तिमाहीच्या परिणामांनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण झाल्याची पहायला मिळाले.

सोमवारच्या या घसरणीमुळे रिलायन्सच्या गुंतवणूकदारांना तब्बल एक लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे. शुक्रवारी रिलायन्सच्या संपत्तीची किंमत 13,89,159.20 कोटी रुपये इतकी होती. त्यात आता 1.12 लाख कोटींची घरसण होऊन ती आता 12,77,991.30 रुपयांवर पोहचली आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये त्यांच्या प्रमोटर्सचा हिस्सा हा 50.49 टक्के इतका आहे. त्यामुळे त्यांच्या संपत्तीत आता जवळपास 55 हजार कोटींची घसरण झाली असून रिटेल गुंतवणूकदारांनाही 8,200 कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

सोमवार संध्याकाळपर्यंत रिलायन्सच्या शेअर्समध्ये 8.62 टक्क्यांची घट नोंदवली गेली आणि त्याचे भाव 1,877.30 रुपयांवर आले. शुक्रवारी कंपनीने सप्टेंबरच्या तिमाहीचे परिणाम सादर केले गेले ज्यामध्ये कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये 15 टक्क्यांची घसरण नोंदवली गेल्याचे स्पष्ट झाली आणि 9,567 कोटींचा तोटा झाला. त्याचाच परिणाम कंपनीच्या शेअर्सवर झाला असून त्यामध्ये मोठी घसरण झाली.

काही विश्लेषकांच्या मते हे शेअर्स अजून घसरण्याचा अंदाज आहे तर काहींच्या मते पुन्हा या शेअर्सच्या भावात तेजी येण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *