रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर : कुर्डूवाडी – मुंबई रेल्वे प्रवास होणार जलद..

| सोलापूर | कुर्डुवाडी ते भिगवन या रेल्वे लाईन च्या विद्युतीकरणाचे काम पुर्ण झाले असुन १६ ते २३ नोव्हेंबर या सप्ताहात कुर्डुवाडी ते दौंड व दौंड ते कुर्डुवाडी या रेल्वे स्टेशन दरम्यान ३१ मालवाहतूक रेल्वे गाड्या धावल्या आहेत.

या विद्युतीकरणाच्या कामामुळे आता कुर्डुवाडी ते मुंबई पर्यंत रेल्वे गाड्या धावणार असुन रेल्वे प्रवास जलद गतीने होणार असल्याने प्रवाशी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.प्रदुषण कमी होऊन रेल्वे खर्चात २० टक्के बचत होणार आहे. शहाबाद वाडी ते भाळवणी हे २५५ कि.मी.चे दुहेरी करणाचे काम पुर्ण झाले असुन आता विद्युतीकरणाचे काम ही पुर्ण झाल्याने गती येणार आहे. या विद्युतीकरणाचे कामला नोव्हेंबर २०१९ ला सुरूवात झाली असली तरी या कामाला खरी गती लॉकडाऊन च्या काळात मिळाली २३ मार्च ते ३१ मे दरम्यान या मार्गावरील यात्री वाहतूक पुर्ण बंद असल्याने विद्युतीकरणाच्या कामाला गती मिळाली व काम पुर्ण झाले.

कुर्डुवाडी ते भिगवन या रेल्वे लाईन चे विद्युती करण उदघाटन व निरिक्षण स्पीड ट्रायल १२ नोव्हेंबर ला मध्य रेल्वेचे सुरक्षा आयुक्त व मुख्यालय अधिकारी व सोलापूर रेल्वे मंडलच्या अधिकारी यांच्या उपस्थितीत घेण्यात आली व १३ नोव्हेंबर ला परवानगी व १६ नोव्हेंबर ला प्रत्यक्षात वाहतूकीला हिरवा कंदील दिला. १६ ते २३ नोव्हेंबर दरम्यान कुर्डुवाडी ते दौंड व दौंड ते कुर्डुवाडी दरम्यान ३१ मालगाड्या विद्युत इंजिन वर चालविण्यात आल्या आहेत.

या विद्युतीकरणाच्या कामामुळे कुर्डुवाडी ते मुंबई पर्यंत रेल्वे विद्युत इंजिन वर चालविण्यात येणार असुन कुर्डुवाडी ते सोलापूर व मिरज ते लातूर या दरम्यान चे विद्युतीकरणाचे काम प्रगती पथावर आहे.

” कुर्डुवाडी ते भिगवन या ५३ किमी चे रेल्वे विद्युतीकरण झाले असुन या विद्युतीकरणामुळे २०% खर्च कपात होत असुन डिझेल ची बचत होऊन प्रदुषणाच्या प्रमाणात ही घट होनार आहे.”
– आर.डी.चौधरी, कुर्डुवाडी रेल्वे स्टेशन प्रबंधक.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *