रेल्वे ३० सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार, या बाबतचे व्हायरल पत्र फेक..!

| मुंबई / नवी दिल्ली | रेल्वेचे मुख्य प्रवासी परिवहन व्यवस्थापक (सीपीटीएम) यांच्या नावे जारी करण्यात आलेल्या तथाकथित मेलमुळे अफवांचा बाजार आज सोशल मीडियावर चांगलाच रंगला. ३० सप्टेंबरपर्यंत देशातील सर्व गाड्या बंद राहतील. यात मेल आणि एक्स्प्रेस, पॅसेंजर ट्रेन आणि ईएमयू-डीएमयूचा समावेश आहे असे नमूद केले आहे. तसेच पूर्व रेल्वेच्या सर्व विभागीय मुख्यालयांनाही मार्क केले आहे.

याबाबत रेल्वे बोर्डाकडे खुलासा केला आहे. त्यांनी तो मेल बनावट असल्याचे म्हटले आहे. रेल्वे बोर्डाने सांगितले की त्यांच्या वतीने असे कोणतेही आदेश देण्यात आले नाहीत. रेल्वे बोर्डाने काढलेल्या पत्रात पुढील आदेश येईपर्यंत सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यावेळी विशेष गाड्या धावणे सुरू राहिल. यापूर्वी २५ जून रोजी रेल्वे बोर्डाने १२ ऑगस्टपर्यंत सर्व नियमित मेल, एक्स्प्रेस आणि प्रवासी रेल्वे सेवांसह उपनगरी गाड्या रद्द केल्या आहेत. 

रेल्वे मंत्रालयानेही याबाबत खुलासा केला. सोशल मीडियावरून फिरत असलेलं पत्र बनावट असल्याचे त्यांनी ट्विट करून स्पष्ट केले. रेल्वे मंत्रालयाने याबाबत कोणतेही परिपत्रक काढलेले नाही. विशेष मेल एक्स्प्रेस गाड्या चालत राहतील.

कोरोना संक्रमण प्रसार रोखण्यासाठी देशात २२ मार्चपासून प्रवासी गाड्या आणि मेल / एक्स्प्रेस गाड्यांची वाहतूक थांबविण्यात आली आहे. देशात प्रथमच रेल्वे सेवा थांबवण्यात आली आहे. तथापि, देशात अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या घरी नेण्यासाठी १ मे पासून विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. १२ मे पासून राजधानी मार्गावर काही विशेष गाड्या चालविण्यात आल्या आणि त्यानंतर१ जूनपासून १०० जोड्या गाड्या सुरू करण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *