राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२० जाहीर, महाराष्ट्रातील दोन शिक्षकांचा गौरव..!

| नवी दिल्ली | समाजाची निस्वार्थ भावाने आणि निष्‍ठेने सेवा करणार्‍या शिक्षकांना त्‍यांच्‍या अंगीकृत कामात प्रोत्‍साहन मिळावे व त्‍यांच्‍या गुणांचा यथोचित या उद्‌देशाने प्राथमिक, माध्‍यमिक, उच्‍च माध्‍यमिक विद्यालयांतील शिक्षकांना पुरस्‍कार देण्‍याची योजना सुरु झाली. राष्ट्रीय शिक्षक पुरस्‍कार योजना सन १९९५-५९ पासुन केंद्र शासनाने सुरु केलेली आहे. हा पुरस्कार शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार समजला जातो. नुकताच २०२० साठीच्या या पुरस्कार प्राप्त शिक्षकांची घोषणा करण्यात आली आहे. त्यात महाराष्ट्रातील दोन शिक्षकांचा समावेश आहे.

https://twitter.com/thelokshakti/status/1297115492159823872?s=19

अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा गोपाळवाडी, राहुरी येथील प्राथमिक शिक्षक नारायण चंद्रकांत मंगलराम यांना तर अटोमिक एनेर्जी शिक्षण संस्थेतील शाळा क्रमांक ४ मधील संगीता सोहनी या महाराष्ट्रातील दोघांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

दरम्यान यात देशातील ४७ शिक्षकांचा गौरव करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील दोन्हीही शिक्षकांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.