रोहित पवारांनी दाखविला सुसंस्कृतपणा, केले हे ट्विट..!

| पुणे | भाजपचे खासदार नारायण राणे यांचे चिरंजीव व माजी खासदार वादग्रस्त व्यक्तिमत्व नीलेश राणे यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यांनी स्वत: याबाबत ट्वीट केलं आहे. त्यांच्या या ट्वीटवर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नीलेश राणे यांनी स्वत:च्या कोरोना चाचणी अहवालाबाबत काल संध्याकाळी एक ट्वीट केलं होतं. ‘कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्याने चाचणी केली असता माझा कोविड-१९ रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्येत उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्याने मी स्वतःला सेल्फ क्वारंटाईन करून घेतले आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी स्वत:ची चाचणी करावी,’ असं आवाहन नीलेश राणे यांनी केलं होतं.

नीलेश राणे यांचं हे ट्वीट रोहित पवार यांनी रीट्वीट केलं आहे. ‘नीलेशजी लवकर बरे व्हा. सर्वांच्या सदिच्छा आपल्या पाठीशी आहेत,’ असं रोहित पवार यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी नीलेश राणे आणि रोहित पवार यांच्यातील ट्विटरयुद्ध गाजलं होतं. पण आजच्या ट्विटच्या माध्यमातून आमदार रोहित पवार यांनी आपल्या सुसंस्कृत पणाची नवी ओळख पुन्हा एकदा महाराष्ट्रासमोर ठेवली आहे, हे मात्र नक्की..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *