रोहित पवार युवा ब्रिगेड या राजकीय संघटनेवरून ,रोहित पवारांचे परिपक्व वक्तव्य..!

| मुंबई | राज्यातील तरुण तडफदार आणि राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांची तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ आहे. राज्यातील युवा नेत्यांमध्ये सध्या सर्वात कार्यक्षम आणि सर्वांना आपलेसे वाटणारे नेते म्हणून रोहित पवार परिचित आहेत. त्यांच्या नावाने एक अराजकीय संघटना स्थापन करण्यात आली आहे. मात्र या संघटनेला रोहित पवार यांनी विरोध केला आहे. हे योग्य नसल्याचं सांगत त्यांनी राष्ट्रवादीसोबत काम करण्याचं आवाहन केलं आहे.

दरम्यान मराठवाड्यातील काही तरुणांनी एकत्र येऊन ‘रोहित पवार युवा ब्रिगेड’ अशा नावाने बिगर राजकीय संघटना स्थापन केली आहे. मात्र, हा निर्णय रोहित पवार यांना पटलेला नाही. त्यांनी तात्काळ ट्विट करून त्यावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. ते ट्विटमध्ये म्हणतात, “माझ्यावर प्रेम करणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी माझ्या नावे अराजकीय संघटना सुरू केल्याचं समजलं. या सर्वांना माझी विनंती आहे की,मी NCP चा आमदार असताना अशी स्वतंत्र संघटना काढणं योग्य नाही. त्याऐवजी आपण एकत्रितपणे सामाजिक काम करत राहू. कार्यकर्ता म्हणून मीही नेहमीच तुमच्यासोबत राहील.”

काही तरुणांनी एकत्र येऊन ‘रोहित पवार युवा ब्रिगेड’ नावाची अराजकीय संघटना स्थापन केली. या संघटनेची पदं आणि जबाबदाऱ्या वाटपाची काही पत्रं सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. संघटनेचे कार्यालय औरंगाबादमध्ये असल्याचे पत्रकावरुन लक्षात येते. या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नवनाथ देवकते हे असल्याचं देखील यावरुन समोर आलंय.

या संघटनेचा विस्तार लातूर, नाशिक, परभणी, औरंगाबादपर्यंत करण्यात आल्याचे पत्रकांवरुन दिसत आहे. याबाबत माहिती मिळताच रोहित पवार यांनी गंभीर दखल घेऊन या कार्यकर्त्यांना ही संघटना स्थापन न करण्याची विनंती केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.