राम जन्मभूमी भूमिपूजन पार्श्वभूमीवर #DhanyawadBalasaheb टॉप ट्रेंडमध्ये…!

| मुंबई | अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षाचा आज शेवट झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन केले आहे. गेल्या अनेक दशकांपासून या मंदिराचा संघर्ष सुरू होता. या संघर्षात अनेकांचे योगदान आहे. यामध्ये शिवसेनेचेही महत्त्वाचे योगदान आहे. राम मंदिराच्या लढ्यात बाळासाहेब ठाकरेंचे मोलाचे योगदान आहे. ट्विटरला भूमिपूजनानिमित्त अनेक ट्रेंड होत आहे. यामध्ये #DhanyawadBalasaheb टॉप ट्रेंडमध्ये आहे.

अयोध्येत राम मंदिर उभं राहत आहे त्यामध्ये बाळासाहेबांचीही मोलाची भूमिका असल्याचे म्हणत नेटकऱ्यांकडून बाळासाहेबांची आठवण काढली जात आहे. यासोबतच बाळासाहेब ठाकरेंशिवाय हे शक्य झाले नसते असं म्हणत बाळासाहेबांची आठवण काढली जात आहे.

नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडला. या निमित्ताने संपूर्ण देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. सोशल मीडियावरही राम मंदिर ट्रेंडींगमध्ये आहे. यामध्ये धन्यवाद बाळासाहेब असा हॅशटॅगही ट्रेंडमध्ये आहे. नेटकरी बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणी शेअर करत आहेत. यासोबतच त्यांच्या योगदानाची आठवण काढली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *