राम मंदिरातील मूर्तीला मिश्या असाव्यात, संभाजी भिडे यांची अजब मागणी..!

| मुंबई | ‘राम मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्त देशभर आनंदोत्सव म्हणून साजरा व्हावा. प्रत्येक घरात रामाच्या प्रतिमेचे पूजन व्हावे. अयोध्येतील मंदिरात मूर्तींची प्रतिष्ठापना करताना सर्व पुरुष देवतांना पुरुषत्वाचे प्रतीक असलेल्या मिशा असाव्यात याची संबंधितांनी खबरदारी घ्यावी,’ अशी अपेक्षा शिव प्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी व्यक्त केली आहे.

राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राम मंदिराचे पतन झाल्यानंतर सुमारे ५०० वर्षांनी आयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन संपन्न होत आहे. गाव, खेड्यात हा राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा करावा. या सोहळ्यात आयोध्येत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे आगत्याने पूजन करावे, अशी मागणी शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी केली.

‘जगात सर्वात अतिप्राचीन असलेल्या भारतीय संस्कृतीवर परकीयांचे हल्ले झाले. सुमारे ५०० वर्षांनी राम मंदिराची पुन्हा उभारणी होत आहे, ही देशाच्या दृष्टीने अतिशय आनंदाची आणि गौरवाची बाब आहे. राम मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्त देशभर आनंदोत्सव म्हणून साजरा व्हावा. हा सोहळा आनंदाचा, मांगल्याचा आनंदोत्सव म्हणून घरोघरी साजरा व्हावा. प्रत्येक घरात रामाच्या प्रतिमेचे पूजन व्हावे. सर्वांनी जात, धर्म बाजूला ठेवून एकत्रित यावे, असं आवाहन भिडे यांनी यावेळी केलं.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करावे :

छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच देशावरील परकीय आक्रमणे थोपवता आली. हिंदुत्व जागृत राहिले, यामुळे अयोध्येतील भूमिपूजनाच्या कार्यक्रमात केंद्र सरकारने अगत्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करावे, अशी आग्रही मागणीही भिडे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *