लोक आरोग्य : आपण ओले खोबरे खाता..? हे आहेत त्याचे फायदे

| मुंबई | तसे नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हटलं जातं ते काही खोटं नाही. या झाडापासून ते त्याच्या फळापर्यंत प्रत्येक घटकाचा कोणत्या ना कोणत्या पद्धतीने उपयोग केला जातो. खासकरुन शहाळं आणि नारळ यांचा सर्वाधिक फायदा होतो. अनेक जण रोजच्या आहारात ओल्या किंवा सुक्या नारळाचा आवर्जुन वापर करतात. मात्र काहींना नारळ किंवा ओलं खोबरं फारसं आवडत नाही. त्यामुळे अनेक जण ते खाण्याचं टाळतात. मात्र ओल्या खोबऱ्याचे हे फायदे पाहिले तर नक्कीच प्रत्येक जण आहारात ओल्या खोबऱ्याचा समावेश करेल.

ओलं खोबरं खाण्याचे फायदे

✓ केस वाढीसाठी नारळाचं तेल, नारळाचं दूध अत्यंत फायदेशीर आहे. केस गळत असल्यास नारळाच्या तेलाने किंवा दुधाने केसांच्या मुळाशी हलक्या हाताने मालिश का.

✓ अंगाची आग होत असल्यास किंवा  खोबरं, काळ्या मनुका आणि खडीसाखर एकत्र करुन खावं.

✓ घसा खवखवून खोकला येत असल्यास ओला नारळ चघळून खावा किंवा घसा सतत कोरडा पडत असेल तर ओल्या नारळाचा कीस आणि साखर खावी.

✓ अशक्त व्यक्ती असल्यास त्यांनी खडीसाखरेसोबत खोबरं खावं. तसंच वजन वाढत नसेल तर गुळ आणि खोबरं एकत्र खावं.

✓ पचनाच्या तक्रारींसाठी रोजच्या जेवणात पुदिना, आले, लसूण, कडिपत्ता व ओला नारळ यांची चटणी अवश्य खावी. याच चटणीत ओवा व सैंधव घातले असता वातामुळे शरीरात कुठेही कंप किंवा थरथरणे याने कमी होते.

✓ नारळाचे तेल केस वाढविते, त्वचेवरील सुरकुत्या कमी करते, त्वचेचा कोरडेपणा घालवते. त्यामुळे अनेक त्वचाविकारात बाहेरून लावायला उपयोगी.

  • ✓ नारळाची करवंटी उगाळून किंवा करवंटीतून निघणाऱ्या तेलाचा उपयोग खरूज, नायटा किंवा पांढरे डाग घालवण्यासाठी केला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *