आपल्या स्वयंपाकघरामध्ये पदार्थांमध्ये सर्रास वापरला जाणारा पदार्थ म्हणजे आले. आल्यामध्ये अनेक औषधीय गुणधर्म असतात. गृहिणी आल्याचा वापर सर्रास लसणीसोबत करतात. आल-लसणाची पेस्ट असली की पदार्थाची चवही वाढते. पण जेवणाची चव वाढवण्यापेक्षाही काही उपयोगी गुणधर्म आल्याचे आहे जे हळूहळू आपण विसरत चाललो आहोत. पूर्वी आजीच्या बटव्यात आल्याला विशेष स्थान होतं. सर्दी खोकला झाला की हमखास आल्याचा उपयोग केला जायचा. पण हल्ली सर्दी खोकल्यावर औषध बाजारात मिळू लागल्याने आल्याचं महत्त्व कमी होऊ लागलं पण असं असलं तरी आल्याच्या गुणधर्माकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, त्याचे फायदे हे प्रत्येक गृहिणीला माहिती असलेच पाहिजे.
✓ महिनाभरात थंडी सुरू होईल, थंडीच्या काळात आलं फारच फायदेशीर असते. थंडीत शरीराला उष्ण ठेवण्यासाठी आल्याच्या रसाचा उपयोग होऊ शकतो. चमचाभर आल्याचा किस घेऊन तो दोन कप पाण्यात घालून उकळून घ्यावा. साधारणतः दहा मिनिटे उकळून हे पाणी थंड करुन घ्यावे. त्यात मधाचे काही थेंब टाकावेत हे पाणी दिवसभरात तीन-चार वेळा घेतल्यानंतर शरीर उष्ण ठेवण्यासाठी मदत होते.
✓ आल्याच्या तुकड्याला साधे किंवा सैंधव मीठ लावून जेवणापूर्वी ते खाल्यास तोंडाची गेलेली चव परत येते.
✓ चांगली भूक लागण्यासाठीदेखील वरील उपाय करुन पाहू शकता.
✓ सर्दी-सायनस असो किंवा पित्ताने डोकेदुखी असो, आले ठेचून त्याचा चोथा कपाळावर घासावा किंवा आल्याचा रस टाळूवर चोळावा. थोडी आग होते, पण लगेच डोके उतरते.
✓ सतत खोकला येत असेल किंवा दम लागला असेल तर एक चमचा आल्याच्या रसात एक चमचा मध घालून सावकाश चाटण करावे आणि गरम पाणी प्यावे, खोकला थांबतो.
✓ पोटदुखी, अपचन, अजीर्ण, ओकारी, मळमळ, पोट डब्ब होणे या सर्व तक्रारींसाठी आले रस+लिंबूरस+सैंधव मीठ यांपासून बनविलेले ‘पाचक’ दिवसभरात २/२ चमचे तीन वेळा गरम पाण्याबरोबर घ्यावे.
✓ अंग थरथरते, दातखीळ बसते, अंग गार पडते यासाठी लगेच आल्याचा तुकडा चघळल्यास फायदेशीर ठरेल.
✓ थंडीच्या दिवसात पाय गरम ठेवण्यासाठी आल्याचा रस पाण्यात उकळून त्याने पायाला मसाज केल्यास लगेच आराम पडतो.
✓ बऱ्याच जणांना खाज अथवा यीस्ट इन्फेक्शन होत असतं. यावरही आलं हे गुणकारी आहे. जे अॅथलिट असतात त्यांच्या पायांना खाज येण्याचं प्रमाण जास्त असतं. यावर आलं हा सर्वोत्तम उपाय आहे. यामध्ये असणाऱ्या अँटिफंगल घटकांमुळे हा आजार लवकर बरा होतो. फंगस इन्फेक्शन कमी करण्यासाठी असणारे सर्व गुणधर्म आल्यामध्ये आढळतात. एका अभ्यासात सिद्ध झालं आहे की, साधारण २९ अँटिफंगल मसाल्याच्या झाडांमधून आल्याच्या झाडात जास्त अँटिफंगल गुणधर्म असतात.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .