लोक आरोग्य : आपली ऑक्सीजन पातळी कमी आहे, मग हे जरूर करा..!

| मुंबई | सध्या कोरोनाच्या काळात महत्वाची आहे ती आपली ऑक्सिजन लेवल.. काल एका टीव्ही पत्रकाराचा शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने निधन झाले. शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण कमी होण्यामागचे कारण कोरोना संसर्ग तर आहे त्यासोबत प्रदूषण देखील. अनेकदा प्रदूषण असते. प्रदूषणामुळे शरीरात ऑक्सिजनचा स्तर कमी होऊ लागतो. इतकंच नव्हे तर दमा, अॅलर्जी, मायग्रेन, फुफ्फुसांमध्ये इन्फेक्शन, खोकला आणि डोळ्यांचा थकवा हे आजार प्रदूषणामुळे होतात. या सगळ्यामागचे कारण म्हणजे शरीरात ऑक्सिजनची कमतरता होय. यासाठी तुम्हाला आहारात अशा गोष्टींचा समावेश केला पाहिजे ज्यामुळे ऑक्सिजनचे शरीरातील प्रमाण वाढेल. यासाठी तुळस फार उपयुक्त आहे.

शरीरात ऑक्सिजनची कमतरता वाढली तर आरोग्यावर परिणाम
प्रदूषणाचा परिणाम आपल्या शरीरातील ऑक्सिजनच्या प्रमाणावर होत असतो. यामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळू शकते. प्रदूषणामुळे श्सासासोबत आपल्या फुफ्फुसात सूक्ष्म कण पोहोचतात. ज्याचा वाईट परिणाम आपल्या शरीरावर होतो. फुफ्फुसांचे काम सुरळीत होत नाही आणि शरीरात इतर समस्या वाढतात. शरीरात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढू लागते. याला कार्बो ऑक्सिहीमोग्लोबिन म्हणतात आणि अनेक आजारांचे हे कारण असते. शरीरात ९० ते १०० टक्के ऑक्सिजनची कमतरता अनेक आजारांना निमंत्रण देते. ९०पेक्षा कमी ऑक्सिजन असल्यास थकवा, स्किन अॅलर्जी, डोळ्यांमध्ये जळजळ, सर्दी-ताप, अस्थमा यासारखे आजार उद्भवतात.

प्रदूषणमुक्त हवा देणाऱ्या तुळशीचे झाड प्रत्येक ठिकाणी लावणे गरजेचे असते. याला घरात लावल्याने घरातील हवा शुद्ध राहते. प्रदूषणाचा स्तर साधारण ३० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात तुळस मदत करते. यासाठी घरात जरूर तुळशीचे झाड लावा. यासोबतच तुळशीचे सेवन करणेही चांगले असते. यासाठी तुळशीचे पाणी पिणे फायदेशीर असते.

कसा बनवाल तुळशीचा काढा :

तुळशीची दहा बारा पाने घेऊन ती स्वच्छ धुवा. आता एका भांड्यात तीन कप पाणी घ्या. यात तुळशीची पाने, एक तुकडा आले, दोन काळी मिरी टाकून चांगले उकळा. हे पाणी आटून दोन कप झाल्यानंतर पाणी गाळून घ्या. दिवसातून हा काढा प्या. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. तसेच शरीरातील ऑक्सिजनचा स्तर वाढतो.

जाणून घ्या काढा पिण्याचे फायदे :

तुळशीच्या नियमित सेवनाने त्वचेशी संबंधित समस्या दूर होतात. रक्त शुद्ध होण्यास मदत होते. तसेच त्वचा उजळते. डायबिटीजचा त्रास असल्यास तुळशीची पाने चावून खा. अथवा याचा काढा करा. हे प्यायल्याने खूप फायदेशीर होतो. मायग्रेनची समस्या असल्यास तुळशीचे सेवन जरूर करा. याची दोन पाने चावून खाल्ल्याने अनेक फायदे होतात.

दरम्यान, शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यासाठी अनुलोम-विलोम, कपालभाती, भस्त्रिका प्राणायाम आणि ओमचा जप करणे अतिशय फायदेशीर ठरते. दररोज केवळ १५ मिनिटे प्राणायाम केल्यास शरीरात ऑक्सिजनचा स्तर सुधारतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *