लोक आरोग्य : गाजर खा..! फिट रहा..!

| मुंबई | गाजर म्हटलं की अनेकांच्या डोळ्यासमोर गाजराचा हलवा येतो. गाजर खाण्याचे शरीराला अनेक फायदे आहेत. मग गाजर तुम्ही कच्चं खा, उकडून खा किंवा कोशिंबीरीच्या स्वरुपात. ही बहुगुणी फळभाजी शरीरातील विविध अवयवांसाठी कशी पोषक आहे.

हे आहेत फायदे : 

✓ गाजरामध्ये अ जीवनसत्वाचं प्रमाण जास्त असल्याने ते डोळ्यांसाठी उपयुक्त ठरतं.

✓ रातांधळेपणा, दृष्टी कमजोर होणं यासारख्या डोळ्यांच्या विकारांवर गाजर खाणं फायदेशीर ठरतं.

✓ गाजर दात आणि हिरड्यांच्या आरोग्यासाठीही परिणामकारक ठरतं. जेवणानंतर गाजर खाल्ल्याने दात स्वच्छ होतात.

✓ दातांच्या तक्रारीवर गाजर खाणं फायदेशीर ठरतं. लहान मुलांना दात येताना गाजराचा रस दिल्यास फार त्रास होत नाही.

✓ गाजर नियमित खाल्ल्याने हाडांचं आणि स्नायूचं आरोग्य सुधारतं. तसेच त्वचेचं आणि केसांचं आरोग्यही चांगलं राहतं.

✓ गाजर हे मेंदूच्या आरोग्यासाठी परिणामकारक ठरतं. गाजर खाल्ल्याने स्मरणशक्ती आणि बुद्धिमत्ता वाढण्यास मदत होते.

✓ पोटाच्या आणि आतड्याच्या तक्रारीवर गाजर उपयुक्त ठरतं. पोटात जंत झाले असतील, तर रोज सकाळी एक कप गाजराचा रस घेतल्यास जंत निघून जातील.

✓ जुलाब होत असल्यास गाजर वाफवून त्याचा रस थोड्या थोड्या वेळाने प्यावा.

✓ कर्करोग, मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब, लठ्ठपणा, हाड आणि स्नायूचे विकार अशा अनेक विकारांवर गाजर उपयुक्त ठरतं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *