लोक आरोग्य : प्या गरम पाणी, व्हा तरुण..!

| मुंबई | पाणी हे जीवन असल्याचे आपल्या सर्वांना माहीत आहे. पाणी शरीरासाठी महत्वाची भूमिका बजावते. एक ग्लास सकाळी उठल्यानंतर पाणी पिणे आरोग्यासाठी खूप लाभदाक असते. तुम्ही ताजेतवाण होता आणि दिवसभर फ्रेश राहता. दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी पोटात गेलेच पाहिजे. मात्र, गरम पाणी पिण्याचे खूप फायदे आहेत. थंड पाण्यापेक्षा गरम पाणी अधिक लाभदायक आहे. सध्या कोरोना काळात देखील गरम पाणी पिण्याचे सल्ले सर्रास दिले जात आहेतच.

१. आपली पचनक्रिया एकदम नाजूक असेल तर गरम पाणी पिणे कधीही चांगले. तसेच तुम्ही वजन कमी करण्यासाठी गरम पाणी पिणे महत्वाचे आहे.

२. तुम्हाला नेहमी सर्दीचा त्रास होत असेल तर गरम पाणी पिणे नेहमी चांगले. गरम पाणी पिल्यानंतर गळाही साफ आणि चांगला राहतो. सर्दी असेल तरही गरम पाण्याने आराम मिळतो.

३. गरम पाण्यामुळे आपल्या शरीरातील अशुद्धपणी दूर होतो. गरम पाण्यामुळे शरीरातील तापमानात वाढ होते. त्यामुळे तुम्हाला घाम येतो. त्यामुळे शरीरातील अशुद्ध घामातून बाहेर पडण्यास मदत होते.

४. महिलांना मासिक पाळीच्यावेळी पोटात दुखत असेल तर तेव्हा थंड पाणी पिण्याऐवजी गरम पाणी प्या. त्यामुळे पोट दुखीवर आराम मिळतो.

५. गरम पाण्यामुळे केस आणि त्वचा चांगली राहण्यास मदत होते. पिंपल्सची समस्याही दूर होते. केस अधिक चमकदार होतात. केसांच्यावाढीसाठी गरम पाणी पिणे महत्वाचे आहे.

६. गरम पाणी पिण्यामुळे पचन क्रिया चांगली राहते. त्यामुळे गॅसची समस्या दूर होते. किंवा गॅस निर्माण होत नाही.

७. गरम पाणी पिण्यामुळे वाढते वय लवकर लक्षात येत नाही. याचे कारण की गरम पाण्यामुळे अशुद्धपणी बाहेर पडतो. त्यामुळे वाढते वय लक्षात येत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *