लोक आरोग्य : प्रतिकार शक्ती वाढवायची आहे..? मग हे वाचाच..!

कोरोनाचं संकट अजूनही धुसर झालेलं नाही. त्यामुळे सगळीकडे भीतीचं वातावरण आहे. त्यातही आता तो भारतातच नव्हे तर पुणे, मुंबई सारख्या शहरांपर्यंत येऊन धडकल्यामुळे सगळ्यांच्या मनात धडकी भरली आहे.

त्यातही कोणाला काही आजार असेल, तर त्या व्यक्तीला हा आजार होण्याची भीती जास्त आहे. म्हणूनच आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे गरजेचे आहे.

या काही खाण्याच्या गोष्टी आपली प्रतिकारशक्ती वाढवतात..!

✓ हळद :

हळद, भारतीयांच्या स्वयंपाक घरातील एक महत्त्वाचा घटक असून अनेक एक भाज्या, करीज मध्ये वापरली जाते. हळद फक्त रंग येण्याकरिता वापरत नसून ती एक anti-inflammatory एजंट म्हणून वापरली जाते.

आपल्याला माहितीच आहे स्वयंपाक घरात थोडसं कापलं वगैरे तर लगेच आपण त्यावर हळद लावतो किंवा खोकला झाला तर हळदीचे दूध पितो.

आपल्या आजीबाईच्या बटव्यातील हळद हा महत्त्वाचा घटक असतो. हळदीचे हेच गुणधर्म लक्षात घेऊन आता परदेशांमध्ये ‘लात्ते टर्मरिक टी’ मिळतो.

✓ लिंबूवर्गीय फळ :

लोक बऱ्याचदा विटामिन सी हवं म्हणून लिंबूवर्गीय फळ खातात. पण ही फळे आपल्या आहारात दररोज असावीत.

सिझन प्रमाणे अशी फळं आपल्याला वर्षभर मिळत राहतात, म्हणजे उदाहरणार्थ संत्री, द्राक्ष, लिंबू .

✓ लाल सिमला मिरची:

लाल सिमला मिरची ही खरं तर विटामिन सी वर्गीय फळांपेक्षा ही जास्त उपयुक्त आहे, कारण या मिरची मध्ये विटामिन सी बरोबरच बीटा कॅरोटीन असतं.

ज्याच्यामुळे केवळ प्रतिकार शक्ती वाढत नाही तर तुमच्या त्वचेचा टोन, स्किन टोन हा खूप छान राहतो.

✓ ब्रोकोली :

ब्रोकोली मध्ये देखील विटामिन, मिनरल्स, एंटीऑक्सीडेंट, फायबर भरपूर प्रमाणात असतात. त्यात विटामिन ए, सी आणि ई असतात. त्यामुळे ब्रोकोलीचा समावेश आहारात असावा.

✓ लसूण :

लसूण, जगभरातल्या कुठल्याही कुझिन मध्ये वापरले जाते. लो बीपी साठी लसुण उपयुक्त आहे. शिवाय इन्फेक्शनचा सामना करण्यासाठी देखील लसुण कामाला येतं.

✓ आलं :

आलं देखील जवळपास जगभरात सगळीकडे वापरला जाते. सर्दी, खोकला झाल्यावर तो आणखीन वाढू नये म्हणून बऱ्याचदा त्याचा वापर केला जातो.

आल्यामुळे कुठल्याही गोष्टीचा आलेला नॉशिया कमी होतो. कोलेस्ट्रॉल कमी होतं, आणि दीर्घ काळातील दुखण्यासाठी देखील उपयुक्त आहे.

✓ पालक :

पालक हे देखील एक उत्तम अँटीआक्सिडेंट असून त्यात बीटा कॅरोटीन ही आहे ज्यामुळे कुठल्याही आजाराचा सामना करायला त्याचा खूप उपयोग होतो.

ब्रोकोली प्रमाणेच पालकही जर थोडसा उकडला तर त्यातील विटामिन ए जास्त ऍक्टिव्ह होतं, आणि त्याचा आपल्या शरीराला खूप उपयोग होतो.

✓ दही :

घरात लावलेलं ताजं दही हे नेहमीच खूप उपयोगाचं असतं. पण विकत आणायचं असेल तर ग्रीक योगर्टचाही पर्याय वापरुन पहायला हरकत नाही. त्याचा आजाराशी सामना करायला खूप उपयोग होतो.

दही आणताना शक्यतो ते साधं असलेलेच जास्त चांगलं. फ्लेवर्ड योगर्ट वापरू नयेत कारण त्यात साखर मिसळलेली असते. जी हेल्थच्या दृष्टिकोनातून उपयोगाची नसते.

✓ बदाम :

विटामिन ई मिळवायचा आणखीन एक स्त्रोत म्हणजे बदाम. रात्री बदाम भिजवून सकाळी त्याची साल काढून खाल्ल्यास ते आपल्या शरीरासाठी फार उपयुक्त आहेत, विशेषतः हृदयासाठी.

✓ ग्रीन टी:

ग्रीन टी, हे देखील एक उत्तम एंटीऑक्सीडेंट आहे. जपानमध्ये कुठल्याही हॉटेलात ग्रीन टी फ्री मिळतो. तो त्यांच्या डाएटचा भाग आहे. म्हणूनच कदाचित जपानी लोक आयुष्यभर हेल्दी राहतात, जास्त वजनही वाढत नाही आणि जास्त वर्ष जगतात.

✓ पपई :

विटामिन सी चां स्त्रोत असलेलं आणखीन एक फळ म्हणजे पपई. पपई मुळे अन्नपचन प्रक्रिया सुधारते. विटामिन सी शिवाय , त्यात विटामिन बी आणि पोट्याशियम हे असते.

✓ किवी:

किवी हे फळ देखील विटामिन सी ने उपयुक्त असून त्यामुळे शरीरातील पांढऱ्या पेशी वाढतात, आणि इन्फेक्शनशी लढतात.

✓ चिकन:

चिकन सूप तुम्हाला सर्दी, खोकल्याच्या वेळेस खूप उपयोगी पडतात. कारण पुढे होणारे आजार त्यामुळे कमी होण्याची शक्यता असते. चिकन आणि टर्की मध्ये विटामिन बी 6 हे मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे तुमच्या शरीरातील हेल्दी लाल पेशी( रेड ब्लड सेल) तयार होतात. बोन मॅरो मधून भरपूर प्रमाणात न्यूट्रियंट्स मिळतात.

✓ सूर्यफुलाच्या बिया, अवाकाडो :

सूर्यफुलाच्या बिया यादेखील विटामिन बी 6 आणि विटामिन ई मिळवण्यासाठी उपयुक्त आहेत याशिवाय ‘अवाकाडो ‘ हे फळ सुद्धा यासाठी उपयुक्त आहे.

शरीराला उपयुक्त झिंक मिळवण्यासाठी मासे वर्गातील खेकडे, कालवं, लॉबस्टर उपयुक्त आहेत.

या सगळ्या गोष्टी रेग्युलर आपल्या आहारात ठेवल्या आणि व्यायाम केला, झोपेचे वेळापत्रक नीट पाळलं तर शक्यतो कुठलाही आजार होणार नाही किंवा झाला तरी त्याची तीव्रता कमी असेल.

महत्वाची सूचना : सदर माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *