लोक आरोग्य : म्हणून तुळस आहे औषधी वनस्पती…!

तुळस हे भारतातील एक पवित्र आणि औषधी गुणांनी भरलेले एक बहुपयोगी रोपटे आहे. भारतात हिन्दी धर्मीयांच्या प्रत्येक घरासमोर तूम्हास तूळस नक्कीच दिसेल. तुळस वृंदावनास माता लक्ष्मीचे रूप मानले जाते. त्यामुळे तूळस भारतीयांच्या मनाशी जूळलेले रोपटे आहे. त्यामूळे यास सर्वत्र एक खास महत्व असते.

तुळशीचे फायदे आणि माहिती :
तुळशीस टाॅनिकही म्हंटले जाते कारण यात जीवनसत्व अ, ब आणि अनेक पोषके आहेत याचे तेल एक जैवप्रतिरोधी आणि प्रतिरोधी मानले जाते त्यामूळे याचा वापर विविध आजारांवरही केला जातो. भारतात यास एक घरगूती औषधाचा भंडार मानले जाते. सर्दी खोकला ताप दांतदुखी श्वासारोध, श्वासात दुर्गंधी, दमा, फुफ्फुसांचे रोग, ह्नदयाचे विकार, हया सर्वांमध्ये तुळस वापरली जाते. तुळशीची ताजी पाने खाल्ल्यास सर्दी खोकला बरा होतो. दातांमध्ये तुळसतेल भरल्यास दातांच्या वेदना कमी होतात. ताजी पाने खाल्ल्यास तोंडातील दुर्गंधी कमी होते.

तुळस आपल्याला विविध संक्रमणापासून वाचवते. तुळस पानांचे २,३ थेंब पाण्यात टाकल्यास पाणी निर्जंतुक होते. लहान बाळांच्या अंघोळीसाठी तुळशीच्या पानांना पाण्यात टाकून त्याने अंघोळ केल्यास आरोग्यदायी मानले जाते. तुळस पाने सुगंधीत असतात. याच्या पानांचा सुगंध घेतल्यास श्वसनतंत्रातील जिवाणूंचे संक्रमण कमी होते. प्रत्येक घरासमोर एक तुळस असल्यास घरातील हवा शुध्द होते. तुळस पानांना कूटून त्यांना मधासोबत घेतल्यास गळयातील कफ दूर होतो. भारतात पारंपारीक पध्दतीने विविध जैविक संक्रमणात विविध औषंधीसोबत तुळसपानांचा वापर केला जातो.

आजही हिन्दू लोकांच्या मते तुळस वृंदावन आपल्या घरास सर्व नकारात्मक आणि वाईट परिणामांपासून वाचवते. तुळशीतील प्रतिजैविक आणि वेदनानाशक गुणामुळे हे प्रत्येकास हवेहवेसे वाटते. तूळसपानाचा चहा पिल्यास ताजेतवाने वाटते. शरीरात सकारात्मक उर्जा प्रवाहीत होते व मानसिक दृष्टया व्यक्ती प्रबळ होतो.

स्वास्थ्यासाठी तुळशीचे फायदे :

तुळस आपल्यासाठी एक महत्वाची औषधी आहे. तुळशीच्या पानांचा, मुळांचा, फुलांचा, फांदयांचा, बिजाचा आणि खोडाचा वापर वेगवेगळया प्रकारे औषधी म्हणून करता येतो.

१. ताप : लहान बाळांना तापा असल्यास तुळसतेलाने आंघोळी आधी बाळाच्या अंगाची तेल मालीश केल्यास ताप कमी होतो. तुळशीत प्रतिजैविके आणि वेदनानाशके असतात त्यामूळे तापावर तूळसपाने खाल्ल्यानेही आराम मिळतो

२. मौखीक स्वास्थ्य टिकवणे : दातांची वेदना, मुखदुर्गंधी, चव नसणे, तोंड कोरडे पडणे या सर्वांवर तुळस पाने चावून खाल्ल्यास फार आराम मिळतो. तुळस पाने एक उत्तम मुखशुध्दीदायक मानले जाते. पुरातन काळात भोजनानंतर तुळसपानांचा स्वाद मुखशुध्दी साठी घेतला जाई. तोंडातील सूज व फोड तूळस खाल्ल्याने बरे होतात. मुखाच्या कर्करोगासाठी तुळशीची पाने खाणे आरोग्यास लाभदायक मानले जाते.

३. दातांची काळजी : तुळसपानांचा वापर दातांचे दूखणे हिरडया कमजोर होणे, दातातून रक्त येणे, दात कमजोर होणे, दात सडणे, या सर्वांवर केल जातो. तूळस पाने ५, १० मिनीटे तोंडात ठेवल्यास चांगला फायदा मिळतो. आपल्या आयुर्वेद आणि इतर ग्रंथांमध्ये यास दातांच्या आरोग्यासाठी अत्यंत लाभकारी मानले जाते. दात ठणकत असेल तर चोळून तूळसपाने ठणकेवर ठेवल्यास ठणकेवर आराम मिळतो.

४. मुत्रपिंडातील खडक : तुळशीत विषजन्यपदार्थांना शरीराबाहेर टाकण्याचे गुण असतात त्यामूळे या गुणांमुळे तूळसपानांचा उपयोग मुत्रपिंडातील खडयांवर होतो. पहाटे निर्जळी ४, ५ तुळशीची पाने खाल्ल्यास मुतखडा शरीराबाहेर टाकला जातो. तुळसपाने चावल्यामुळे लघवीत त्रास होत नाही. लघवी गरम होत नाही. त्यामूळे मुत्रविसर्जनात वेदना कमी होण्यास फार लाभ मिळतो.

५. त्वचेची काळजी : तुळसपानांचा वापर त्वचासंक्रमणावरही होतो. तूळस पानांचा लेप त्वचा संक्रमणावर लावून उन्हात बसल्यास व वाळल्यावर कोमट पाण्याने अंघोळ केल्यास फार लाभ मिळतात. स्त्रिया तुळसपानाच्या लेपास उत्तम शरीर माॅश्चरायझर म्हणून वापरतात. स्त्रियांच्या खाजगी जागांवरील विविध संक्रमणासाठी तुळसपानांच्या लेपाचा वापर होतो. तुळशीच्या पानांनी अंघोळ केल्यास त्वचा टवटवीत होते. तसेच त्वचेवर संक्रमण होत नाही.

६. डोकेदुखी : फार डोके दुखणे ( मायग्रेन ), नाकाच्या हाडाच्या वाढीमुळे डोके दुखणे, सर्दी कफ, उच्च रक्तदाबामुळे डोकेदुखी झाल्यास तुळसपानांचा लेप डोक्यावर लावल्यास डोकेदुखी लवकर बरी होते. तुळसतेलाने डोक्याची व कपाळाची मालीश केल्यास फायदा होतो. केसांच्या तेलात तुळसतेल मिसळून त्याने केसाची मालीश केल्यास डोकेदुखी कमी होते. तुळशीतील कॅम्फेन, किनोल, यूग्नोल, कार्वक्रोल आणि मिथाईल चााविकोल या औषधीय घटकांमुळे डोकेदूखी कमी केल्या जाते.

७. कमी वयात वयस्कपणा वाढीवर उपाय : तुळशीमधील जीवनसत्वे अ आणि ब हे चांगले एंटी आॅक्सीडेंट नी भरलेले असतात त्यामूळे शरीरास टवटवीत आणि चमकदार ठेवण्यास मदत मिळते. पाण्यासोबत तुळसपानांचा रस घेतल्यास शरीरातील विविध संस्था निटपणे कार्य करतात त्यामूळे शरीरास वृध्दावस्था लवकर येत नाही.

८ प्रतिरक्षा करणे : तूळशीला एक संपुर्ण औषधी गुण युक्त मानले जाते. शरीराचे पोषण करून त्यांच्या सर्व प्रतिरक्षकांना जीवन देवून त्यांचे कार्य सूरळीत चालविते. त्यामुळे विविध आजारांशी लढतांना शरीर प्रतिकारशक्ती प्रणाली चांगल्याप्रकारे कार्य करते.

९. डोळयाची काळजी : डोळयांमध्ये संक्रमण झाल्यास त्यांना तुळसपानांनी धूतल्यास डोळयातील संक्रमण बरे होते. डोळयांची सूज, आणि डोळे जळजळीवर तूळसतेल डोळयांत 2,3 थेंब टाकल्यास डोळे निरोगी होतात. डोळयातील विविध व्याधींसाठी वापरल्या जाणा-या आयुर्वेदिक ड्राॅप आणि औषधीमध्ये तुळसतेलाचा वापर होतो. याशिवाय तुळशीचा वापर रेडिएशनच्या आणि विषजन्य परजिवांच्या बचावासाठी करतात.

कर्करोगातील आणि टयुमर मधील कोशिका नष्ट करण्यासाठी विविध औषधींमध्ये तुळशीचा वापर होतो. यासोबत जठराचे दुखणे, डांग्याखोकला, काॅलरा, हातपायामधील दुखणे या सर्वांवर चांगले वेदनानाशक मानले जाते तुळस किती उपयोगी आहे. म्हणून तुळशीला इतके पवित्र मानले जाते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *