लोक आरोग्य : लसूण खाण्याचे हे आहेत फायदे..!

| मुंबई | समुद्रमंथनानंतर देव आणि दानव यांच्यात अमृताच्या प्राप्तीसाठी भांडण झाले. या भांडणात अमृताचा कलश हिसकावून घेताना त्यातला एक थेंब पृथ्वीवर पडला. तो थेंब पृथ्वीच्या कुशीत रुजला आणि आंबट रस वगळता निसर्गातील पाच रस घेऊन लसणाचा कोंब बाहेर आला.

लसणासंदर्भात ही कथा प्रचलित आहे. अगदी तुमच्या आजीनं देखील तुम्हाला लहानपणी ही कथा सांगितली असेल. आता या कथेत किती तथ्य आहे हे माहीत नाही. पण लसूण आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो याची मात्र फुल्ल गॅरंटी आहे!

आयुर्वेदात लसणाचे खूप फायदे सांगितले आहेत. कोणी लसूण कच्चा खातात तर कोणी भाजीत किंवा त्याची चटणी करू खातात. पण फार कमी जणांना माहिती की लसूणाचे सेवन भाजूनही करणे फायदेशीर ठरते. विशेषतः पुरूषांसाठी असा लसूण खाणे फायदेशीर असते. लसणामध्ये सल्फरचे प्रमाणा अधिक असते. या एलिसीन नावाचा घटकही असतो. त्यामुळे लसणामध्ये अँटी बॅक्टेरियल, अँटी फंगल आणि अँटी ऑक्सीडेंट विशिष्ट्ये असतात. लसणावर झालेल्या रिसर्चनुसार लसणात असलेल्या फाइटोकेमिकल्समध्ये पुरुषांच्या आरोग्यासाठी फायदा होतो.

आयुर्वेदाचे डॉक्टर नेहमी पुरूषांना रात्री भाजलेल्या लसणाची एक पाकळी खाण्याचा सल्ला देतात. जाणून घ्या काय आहे, फायदे….

१) सेक्स हार्मोन तयार करतो
लसणामध्ये एलिसिन नावाचा पदार्थ असतो त्यामुळे पुरूषांना मेल हार्मोन म्हणजे सेक्स हार्मोनचे प्रमाण योग्य ठेवण्यात मदत होते. त्यामुळे पुरूषांचा इरेक्टाइल डिस्फंक्शन दूर होतो. तसेच लसणामध्ये सेलेनियम आणि मोठ्या प्रमाणात व्हिटामीन असते. त्यामुळे स्पर्म क्वालिटी वाढण्यात मदत होते.

२) दाताच्या दुखण्यात उपयोगी
भाजलेल्या लसूण खाल्ल्याने दातांचा दुखण्यात आराम मिळतो. दात दुखत असेल तर लसूण वाटून तो दुखणाऱ्या दातावर ठेवा, याने त्वरित दुखणे बंद होते. लसणात अँटी बॅक्टेरियल घटक असल्याने दातांचे दुखणे दूर करतो. दातांच्या दुखण्यातून सुटका मिळविण्यासाठी त्याला कच्चाही वाटून दातांवर लावला तरी फायदा होतो.

३) हृदयासाठी फायदेशीर
भाजलेला लसूण ब्लड प्रेशर पण कंट्रोल करतो. याचे सेवन हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. लसूण खाल्ल्याने बीपी कमी होतो.

४) कॅन्सरपासून बचाव
लसूण खाल्याने शरिरात गरमी निर्माण होते, तसेच थंडीपासून रक्षा होते. तसेच लसूण कँन्सरपासूनही बचाव करतो. लसूण विशेषतः प्रोस्ट्रेट आणि ब्रेस्ट कॅन्सर पासून संरक्षण करतो.

५) पोटातील गडबड दूर करतो.
तुमचे पोट खराब असेल किंवा तुम्ही लवकर पोटातील इन्फेक्शनचे बळी पडतात तर भाजेला लसूण खा. यामुळे छातीत जळजळ, उल्टी आणि पोटात गडबड दूर करण्यात मदत होते.

६ ) डायरिया या विकारामध्ये लसणाच्या सेवनानमुळे आराम मिळतो. यासाठी पाण्यात लसणाच्या सहा-सात पाकळ्या टाकाव्यात. ते पाणी आठ-नऊ मिनिटं उकळवून घ्यावे. त्यानंतर हे पाणी थंड करून रिकाम्या पोटी सेवन करावे. यामुळे शरीरातील निरूपयोगी घाटक पदार्थ शरीराबाहेर फेकले जाण्यास मदत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *