लोक आरोग्य : वाफ घेणे तसे चांगले पण अतिरेक नको, हे होऊ शकतात दुष्परिणाम..!

कोरोना व्हायरसची लोकांच्या मनात भीती बसली आहे. यापासून सुरक्षा म्हणून प्रत्येक व्यक्ती आपआपल्या परीने प्रयत्न करीत आहे. गरम पाणी पिण्याने किंवा गरम पाण्याची वाफ घेतल्याने कोरोना विषाणूचा धोका टाळता येऊ शकतो असे म्हटले जात आहे. डॉक्टरांचा देखील विश्वास आहे की स्टिम थेरेपीमुळे विषाणू जिवंत राहण्याची शक्यता नाहीशी होते. त्यामुळे वाफ घेणे योग्य ठरेल.

✓ वाफ घेण्याची सोपी पद्धत :
एका पातेल्यात एक-दोन ग्लास पाणी उकळून घ्या. पातेलं गॅसवरुन खाली उतरवून घ्या. डोक्यावर टॉवेल घेऊन वाफ नाकाने घेऊन तोंडाने सोडावी तसेच तोंडाने घेऊन नाकाने सोडावी.
त्याचप्रमाणे एका नाकपुडीने घेऊन दुसर्‍या नाकपुडीने सोडावी व परत दुसर्‍या नाकपुडीने करावे. वाफ घेण्यासाठी केवळ गरम पाणी पुरेसं आहे तरी आपल्या आवश्यकतेप्रमाणे यात चिमूटभर हळद आणि सेंधा मीठ घालून देखील वाफ घेता येऊ शकते.

कोरोना विषाणूवर ही सर्वात सुरक्षित, प्रभावी आणि स्वस्त पद्धत आहे. दिवसातून एक किंवा दोनदा वाफ घेणं योग्य ठरेल. याहून अधिक वेळा वाफ घेतल्याने फुफ्फुसांवर वाईट परिणाम होऊ शकतो.

The Journal Of The American Medical Association (JAMA) च्या एका रिपोर्टनुसार स्टीम थेरपी म्हजेच वाफ घेतल्यानं कफ किंवा सर्दी पूर्णपणे बरी होत नाही. वाफ घेणारे आणि वाफ न घेणाऱ्यांमध्ये तुलना केली तर वाफ घेणाऱ्यांची सर्दी लवकर बारी झालीये.

दरम्यान डॉक्टर सर्दी किंवा कफ झाला की वाफ घेण्याचा सल्ला देतात. कारण वाफ घेतल्यामुळे तुमच्या नाकातला आणि गळ्यातला म्युकस ज्यामुळे कफ तयार होतो तो पातळ होतो. तसंच तुमच्या शरीरात कमी झालेलं ऑक्सिजनचं प्रमाणही वाढतं त्यामुळे तुम्हाला मोकळा श्वास घेता येतो.

सध्या सोशल मीडियावर कोरोना पासून बचाव करण्यासाठी वाफ घ्या असे मेसेज व्हायरल होत आहेत. मात्र वाफ घेण्याचे काही दुष्परिणामही आहेत:

• जास्त वेळ वाफ घेतल्यामुळे तुमच्या शरीरात अतिउष्णता तयार होऊ शकते ज्यामुळे तुमच्या आतड्यांना त्रास होऊ शकतो.
• जास्त तापमानावर वाफ घेतल्यामुळे तुमच्या शरीराला हानी होऊ शकते.
• अति वाफेमुळे तुमची त्वचा खराब होऊ शकते. तुमच्या गळ्यातले टिशू बर्न होण्याची शक्यता असते.
• तुमच्या चेहऱ्यावर आणि गालावर लालसर चट्टे येऊ शकतात.
• जास्त वेळ वाफ घेतल्यामुळे तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. त्यामुळे या वाफ घेण्याचा उलट परिणामही तुमच्या शरीरावर होऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *