| मुंबई | यंदाचे ‘आयपीएल’ यूएईमध्ये खेळवले जाणार असल्याची घोषणा झाल्यानंतर कोणता संघ फॉर्मात असणार, याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. सर्वच टीम्स नेटाने सराव करत आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (आरसीबी) संघात गोलंदाज आदित्य ठाकरे याची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी नावसाधर्म्य असलेला हा युवा क्रिकेटपटू आहे विदर्भाचा ! ‘आयपीएल’साठी किती खेळाडू यूएईला न्यायचे, यावर बीसीसीआयने बंधन घातलेले आहे. पण यूएईमध्ये फलंदाजांना अधिकाधिक सरावासाठी विविधता असलेले गोलंदाज आवश्यक आहेत. ही गरज ओळखून ‘आरसीबी’ संघ व्यवस्थापनाने वेगवान गोलंदाज आदित्य ठाकरेची निवड केल्याची माहिती आहे.
आदित्य ठाकरे हा गेल्या काही वर्षांपासून सातत्याने चांगली गोलंदाजी करत आहे. २०१८ मध्ये झालेल्या १८ वर्षांखालील युवा विश्वचषकातही आदित्यने दमदार कामगिरी केली आणि तो प्रकाशझोतात आला. आदित्यने स्थानिक क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याची वर्णी यावर्षी आरसीबीच्या चमूमध्ये लागल्याचे बोलले जाते.
फलंदाजांना सराव देण्यासाठीच आदित्यला आरसीबी संघाबरोबर यूएईला नेण्याचा निर्णय तूर्तास झाला आहे. मात्र नेट्समध्ये सराव करताना त्याची गोलंदाजी कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षकांना आवडली, तर त्याला मैदानात उतरण्याचा जॅकपॉटही लागू शकतो. आयपीएल खेळण्याचीही संधी मिळू शकते.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .