| मुंबई | जगातील लोकांच्या सर्वात जास्त पसंतीस उतरलेलं मेसेजिंग अॅप म्हणून व्हॉट्सअॅपकडे पाहिलं जातं. व्हॉट्सअॅप अतिशय युझर फ्रेंडली अॅप आहे. युझर्सना सतत काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न व्हॉट्सअॅप नेहमीच करत असतं. आपल्या युझर्ससाठी आणखी काही नवी फिचर्स आणण्याच्या तयारीत आहे.
व्हॉट्सअॅपवर काही खास फिचर अपडेट होण्याची शक्यता आहे. या फिचर्सचा तुम्हाला बराच फायदा होणार आहे. असेच काही फिचर्स पाहुयात.
✓ वेब व्हॉट्सअॅपचा आयकॉन :
सध्या वर्क फ्रॉम होममुळे अनेक जण घरी बसूनच आपलं काम सांभाळत आहेत. अशावेळी अनेकांना वेब व्हॉट्सअॅपची गरज भासते. तर या वेब व्हॉट्सअॅपचा आयकॉन अपडेट होण्याची शक्यता आहे.
✓ मीडिया गाइडलाइन्स :
व्हॉट्सअॅपने मीडिया गाइडलाइन्स नावाचं एक फिचरही देण्यास सुरुवात केली आहे. या फिचरमुळे युझर्सना फोटो, व्हिडीओ आणि GIF एडिट करताना स्टिकर्स आणि टेक्स्टसुद्धा अलाइन करण्याची सुविधा प्राप्त होईल.
✓ कॅटलॉग शॉर्टकट :
व्हॉट्सअॅपमध्ये कॅटलॉग शॉर्टकट नावाचं एक बटण देण्यात आलं आहे. यामुळे युझर्सना बिझनेस कॅटलॉगचा अॅक्सेस मिळतो. WeBetaInfoच्या रिपोर्टनुसार व्हॉट्सअॅपने अँड्रॉईड, बिझनेस आणि IOS अॅपमध्ये हे फिचर दिलं आहे. हे फिचर तुम्हाला व्हॉट्सअॅप वेब आणि डेक्टटॉप बेस्ड् अॅपमध्येही वापरता येणार आहे.
✓ स्टोरेज युझेस सेक्शन
व्हॉट्सअॅपने Storage Usage सेक्शनही देण्यास सुरुवात केली आहे. या फिचरमुळे मीडियामध्ये कोणत्या फाइल्स डिलिट करायच्या आहेत हे युझर्सना लवकर लक्षात येईल.
✓ ऑलवेज म्युट
व्हॉट्सअॅप वापरताना आपल्याला सतत मेसेज येत असतात. सतत मेसेज टोन वाजत राहिल्यामुळे आपलं कामाकडे दुर्लक्ष होऊ शकतं. हीच अडचण लक्षात घेऊन व्हॉट्सअॅपने ऑलवेज म्युट हे फिचर आणलं आहे.
ज्यामुळे काही पर्सनल चॅट्स आणि ग्रुप चॅट्स कायमचे म्युट करू शकतो. आधी ही सुविधा जास्तीत जास्त एक वर्षासाठी होती. आता नको असलेल्या चॅट्स आपण कायमचं म्युट करून ठेऊ शकतो.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .