वादग्रस्त वक्तव्यावरून अडचणीत सापडलेल्या इंदुरीकर महाराज यांना कोर्टाचा दिलासा..!

| संगमनेर | आपल्या वक्तव्यामुळे अडचणीत सापडलेले लोकप्रिय कीर्तनकार निवृत्ती इंदुरीकर महाराज यांना कोर्टाने तुर्तास दिलासा दिला आहे. संगमनेर प्रथमवर्ग न्यायालयाने दिलेल्या आदेशाला तुर्तास स्थगिती देण्यात आली आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर इंदुरीकर महाराजांना संगमनेर प्रथमवर्ग न्यायालयाने हजर राहण्याचा आदेश दिले होते. या प्रकरणी आज सकाळी ११ वाजता सुनावणी झाली. आजच्या सुनावणीत जिल्हा न्यायालयाने प्रथमवर्ग न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे इंदुरीकर महाराजांना कोर्टात हजर राहण्याची आवश्यकता नसणार आहे. या प्रकरणी सरकारी पक्षाला २० ऑगस्टला सुनावणीसाठी हजर राहावे लागणार आहे.

‘अमुक दिवशी स्त्रिसंग केला तर मुलगा होतो किंवा मुलगी होते’ असं वक्तव्य असलेला इंदुरीकर महाराज यांचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टिकेची झोड उठली होती. काही सामाजिक संघटना आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीने इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी केली होती. मात्र, त्यांनी हे वक्तव्य कुठे आणी कधी केले याबाबत कुठलाही पुरावा नसल्याचं कारण देत मार्च महिन्यात अहमदनगर जिल्हा प्रशासनाने गुन्हा दाखल केला नव्हता.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या रंजना गवांदे यांनी याबाबत मात्र पाठपुरावा करून संबंधित प्रकरणाचे पुरावे जिल्हा आरोग्य विभागाला दिल्यानंतर २६ जुन रोजी संगमनेर कोर्टात जिल्हा आरोग्य प्रशासनाने इंदोरीकर महाराज यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.

नेमकं इंदुरीकर महाराज काय बोलले ?

‘स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टाईमिंग हुकला की क्वालिटी खराब असं सांगत, पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिराण्यक्ष नावाचा राक्षस जन्माला आला हिरण्यकक्षपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माल आला.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *