विधानसभा अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली जुन्या पेन्शनच्या प्रश्नाबाबत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेची लवकरच बैठक होणार…

| नागपूर | १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना जूनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्याचे विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांची भेट महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांच्या नेतृत्वात घेण्यात आली. त्यांच्या सोबत राज कडव गोंदिया जिल्हाध्यक्ष व जिल्हा कोषाध्यक्ष प्रविण सरगर उपस्थित होते.

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली असता त्यांनी या विषयाची मला संपूर्ण माहिती असून या प्रश्नाबाबत आत्मीयता देखील असल्याचे सांगितले. संघटेनेचे मोर्चे भव्य आणि नियोजन बद्ध असल्याचा उल्लेख त्यांनी आवर्जून केला. या चर्चे दरम्यान सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, ही संघटनेची प्रामाणिक भूमिका असून त्या अनुषंगाने वित्त विभाग, शिक्षण विभाग, ग्रामविकास विभाग मधील मुख्य अधिकारी यांच्या समवेत येत्या काही दिवसात लागलीच बैठक आयोजित करणार असल्याचे लेखी आश्वासन त्यांनी संघटनेच्या निवेदनावर दिले आहे, असे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांनी सांगितले आहे.

तसेच संघटना आपल्या मार्गदर्शनाखली लढा अजुन तीव्र करेल, आपण मार्गदर्शक व्हावे, अशी गळ देखील उपस्थित शिष्टमंडळाने घातली असता, येत्या आठवड्यात पुन्हा याबत भेटून सविस्तर चर्चा करू असे त्यांनी आश्वस्त केले असल्याचे देखील श्री. खांडेकर यांनी सांगितले आहे.

लवकरच पुन्हा विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची भेट होणार असुन बैठकीचे नियोजन लवकरच होईल यात शंका नाही असे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांनी दैनिक लोकशक्ती शी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *