व्यक्तीवेध : नोबेल पुरस्कार प्राप्त अमेरिकन साहित्यिक लुइज ग्लूक..

स्वीडिश नोबेल कमेटीने गुरुवारी अमेरिकन कवयत्री लुइज ग्लूक (७७) यांना या वर्षीचा साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर केला आहे.

1943 साली न्यूयॉर्कमध्ये जन्म झालेल्या ग्लूक केंब्रिज (मैसाच्युसेट्स) मध्ये राहतात. कविताशिवाय त्या येल यूनिव्हर्सिटीमध्ये इंग्रजीच्या प्राध्यापीका आहेत. 1968 मध्ये लुइस यांचे पहिले पुस्तक फर्स्टबोर्न प्रकाशित झाले होते. यानंतर त्या अमेरिकेतील एक प्रख्यात समकालीन साहित्यिक बनल्या. लुइस यांच्या कवितेचे 12 संग्रह प्रकाशित झाले आहेत, तसेच त्यांनी अनेक निबंधही लिहीले आहेत. लुइस कवितेतील स्वच्छतेसाठी ओळखल्या जातात. त्यांनी लहानपण, कौटुंबिक आयुष्य, आई-वडिलांचे मुलांसोबतचे नाते अशा अनेक विषयांवर अनेक कवित्या लिहील्या आहेत. 1992 मध्ये आलेल्या ‘द वर्ल्ड आइरिस’ ला लुइस यांच्या उत्कृष्ट कविता संग्रहांपैकी एक मानले जाते. यात ‘स्नोड्रॉप’ कवितेत सर्दीनंतर रुळावर आलेल्या आयुष्याला दाखवले आहे.

लुईस यांना १९९३ मध्ये साहित्य विभागात पुलित्झर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. मागील वर्षी २०१९ मध्ये ऑस्ट्रियाचे वंशाचे लेखक पीटर हँडका यांनी साहित्यातील नोबेल पुरस्कार देण्यात आला होता. नाविन्यपूर्ण लेखन आणि भाषेतील नवीन प्रयोगाची दखल घेत त्यांना हा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला.

१९०१ मध्ये सुरू झालेल्या नोबेल पुरस्काराच्या ११९ वर्षाच्या इतिहासात दोन वेळेस साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार स्थगित करण्यात आला आहे. दुस-या महायुद्धा दरम्यान १९४३ मध्ये पहिल्यांदा पुरस्काराला स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर २०१८ मध्ये स्वीडीश अ‍ॅकेडमीच्या परीक्षक मंडळाचे सदस्य कॅटरीना यांचे पती आणि फ्रान्सचे छायाचित्रकार जेन क्लोड अरनॉल्ट यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप झाले होते. त्यावेळी हा पुरस्कार स्थगित करण्यात आला होता.

लुईक ग्लूक यांचा थोडक्यात परिचय

ग्लूक अमेरिकेतील येल विद्यापीठामध्ये इंग्रजीच्या प्राध्यापक आहेत. त्यांचा जन्म २२ एप्रिल १९४३ रोजी झाला आहे. त्या ७७ वर्षांच्या आहेत. त्यांची कविता प्रामुख्याने बाल्यावस्था, कौटुंबिक जीवन, आई-वडील आणि भाऊ-बहीण यांच्यातील घनिष्ठ संबंधांवर भाष्य करते.

ग्लूक यांचा ‘फर्स्टबॉर्न’ हा पहिला कवितासंग्रह १९६८मध्ये प्रकाशित झाला. या पहिल्याच कवितासंग्रहाने त्यांचा अमेरिकेतील नामवंत कवयित्रीमध्ये समावेश झाला. ग्लूक यांचे आतापर्यंत १२ कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यात ‘Firstborn’ (१९६८), ‘The House on Marshland’ (१९७५), ‘Descending Figure’ (१९८०), ‘The Triumph of Achilles’ (१९८५), ‘Ararat’ (१९९०), ‘The Wild Iris’ (१९९२), ‘Meadowlands’ (१९९७), ‘Vita Nova’ (१९९९), ‘The Seven Ages’ (२००१), ‘Averno’ (२००६), ‘A Village Life’ (२००९), ‘Faithful and Virtuous Night’ (२०१४) या कवितासंग्रहांचा समावेश आहे. तर ‘The First Four Books of Poems’ (१९९५) आणि ‘Poems : 1962–2012’ (२०१२) हे त्यांच्या निवडक कवितांचे संग्रह आहेत.

आतापर्यंत ग्लूक यांना अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. ‘पुलित्झर पारितोषिक’, ‘नॅशनल ह्युमॅनिटीज मेडल’, ‘नॅशनल बुक अवार्ड’, ‘नॅशनल बुक क्रिटिक्स सर्कल अवार्ड’ इत्यादी. २००३-२००४ दरम्यान त्या अमेरिकेच्या ‘पोएट लॉरिट’ होत्या.

ग्लूक यांची ओळख बहुतांश वेळा आत्मचरित्रात्मक कवयित्री म्हणून करून दिली जाते. त्यांची कविता प्रासादिक आणि ओघवती म्हणून नावाजली गेली आहे. तसेच ती तीव्र भावनिक संवेदनेसाठी ओळखली जाते. ती वैयक्तिक अनुभव व आधुनिक जगाकडे दंतकथा, इतिहास किंवा निसर्गाच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करते. त्यांची कविता एकाकीपणा आणि उदासीनता यांची अभिव्यक्ती करते. आत्मचरित्र आणि शास्त्रीय मिथके यांची सांगडही त्यांच्या कवितेतून पाहायला मिळते.

Leave a Reply

Your email address will not be published.