व्यक्तिवेध : साहित्य क्षेत्रातील अँग्री यंग मॅन – दुष्यंत कुमार

आज हिंदीतले प्रसिद्ध कवी दुष्यंत कुमार यांचा जन्मदिन..! दुष्यंत कुमार यांचे कोट्स (विचार), कवितांच्या ओळी नेहमीच सोशल मीडियावर पाहायला मिळतात. परंतु हे दुष्यंत कुमार कोण आहेत? हे काहींना माहिती नाही. दुष्यंत कुमार यांच्या शेकडो कविता इंटरनेवर उपलब्ध आहेत. परंतु त्यांच्याविषयी खूप कमी माहिती इंटरनेटवर आहे. या लेखात दुष्यंत कुमार यांच्याविषयीची काही माहिती तसेच त्यांच्या प्रसिद्ध कवितांबद्दल जाणून घेऊया.

दुष्यंत कुमार त्यागी(१९३३-७७) उत्तर प्रदेशमधील बिजनौर येथील रहिवासी होते. हिंदी कवी आणि गजलकार म्हणून ते परिचित आहेत. त्यांचा जन्म १ सप्टेंबर १९३३ रोजी उत्तर प्रदेशमधील राजपूर नवादा या गावात झाला.

दहावीत असल्यापासून दुष्यंत कुमार यांनी कविता लिहिण्यास प्रारंभ केला. इंटरमीडिएटचे शिक्षण सुरु असताना त्यांनी राजेश्वरी कौशिक यांच्याशी विवाह केला. अलाहाबाद विद्यापीठामधून त्यांनी हिंदीत बी. ए. आणि एम. ए. चे शिक्षण घेतले. याच काळात त्यांना डॉ, धीरेन्द्र वर्मा, डॉ. रामकुमार वर्मा, कथाकार कमलेश्वर, कथाकार मार्कण्डेय कवी धर्मवीर भारती, कवी विजयदेवनारायण साही यांचा सहवास लाभला. त्यांच्या सहवासात दुष्यंत यांची लेखणी अधिक बहारदार झाली.

पदवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी आकाशवाणी भोपाळमध्ये असिस्टंट प्रोड्यूसर म्हणून काम केले. दुष्यंत कुमार हे अत्यंत मनमौजी व्यक्ती होते. ते सुरुवातीच्या काळात दुष्यंत कुमार परदेशी या नावाने लेखन करायचे. १९७५ मध्ये त्यांचा ‘धूप’ हा गजलसंग्रह प्रकाशित झाला. त्यामधील गजलांना खूप लोकप्रियता मिळाली. त्यामधील शेर-शायऱ्या लोकांना तोंडपाठ होत्या. त्याकाळातील वृत्तपत्र आणि वाचक ‘धूप’ला तरुणांची गीता (भगवतगीता – युवामन की गीता )म्हणायचे.

धूप’ या गजलसंग्रहामधील काही प्रसिद्ध शेर

⦁ हो गई है पीर पर्वत-सी पिघलनी चाहिए, इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए।
⦁ मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही, हो कहीं भी आग, लेकिन आग जलनी चाहिए।
⦁ एक जंगल है तेरी आँखों में, मैं जहाँ राह भूल जाता हूँ।
⦁ तू किसी रेल-सी गुजरती है, मैं किसी पुल-सा थरथराता हूँ।
⦁ यहाँ दरख्तों के साये में धूप लगती है, चलो यहाँ से चलें और उम्र भर के लिए।
⦁ मत कहो आकाश में कुहरा घना है, यह किसी की व्यक्तिगत आलोचना है।
⦁ खास सडके बंद हैं कबसे मरम्मत के लिए, ये हमारे वक्त की सबसे सही पहचान है।
⦁ मस्लहत आमेज होते हैं सियासत के कदम, तू न समझेगा सियासत तू अभी इंसान है।
⦁ कल नुमाइश में मिला वो चीथडे पहने हुए, मैंने पूछा नाम तो बोला कि हिंदुस्तान है।
⦁ गूँगे निकल पडे हैं जुबाँ की तलाश में, सरकार के खिलाफ ये साज़िश तो देखिए।

दुष्यंत कुमार यांच्या प्रमुख कविता

‘धूप के पाँव’, ‘कहीं पे धूप की चादर’, ‘जलते हुए वन का वसन्त’, ‘आज सड़कों पर’, ‘आग जलती रहे’, ‘एक आशीर्वाद’, ‘आग जलनी चाहिए’, ‘हो गई है पीर पर्वत-सी’,’कहाँ तो तय था’, ‘कैसे मंजर’, ‘खंडहर बचे हुए हैं’, ‘जो शहतीर है’, ‘जिंदगानी का कोई’, ‘मकसद’, ‘मुक्तक’, ‘आज सडकों पर लिखे हैं’, ‘मत कहो, आकाश में’, ‘गुच्छे भर’, ‘अमलताश’, ‘सूर्य का स्वागत’, ‘आवाजों के घेरे’, ‘मापदण्ड बदलो’, ‘बाढ की संभावनाएँ’, ‘इस नदी की धार में’

साहित्यिक कलाकृती
कादंबरी : ‘सूर्य का स्वागत’, ‘आवाज़ों के घेरे’, ‘जलते हुए वन का बसंत’, ‘छोटे-छोटे सवाल’ , ‘आँगन में एक वृक्ष, ‘दुहरी जिंदगी’
नाटक : और मसीहा मर गया
काव्य नाटक : एक कंठ विषपायी
लघुकथा : मन के कोण
गजलसंग्रह : साये में धूप

दुष्यंत कुमार एक असे साहित्यिक आहेत ज्यांनी गजल या साहित्यप्रकाराला सामन्य माणसाशी जोडण्याचे काम केले. स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये त्यांनी सामन्य माणसाला होणारे त्रास, त्याच्या मनातील विचार, देशाची दुर्दशा याविषयी कवितेच्या, गजलेच्या माध्यमातून लेखन केले.

देशाची दुर्दशा पाहून कवी शांत बसू शकत नाही, असे त्यांचे म्हणणे होते. याबाबत दुष्यंत कुमार लिहितात की, “मुझमें बसते हैं करोडो लोग, चुप रहूं कैसे? हर गजल अब सल्तनत के नाम बयान है।”

बर्‍याचशा प्रतिभावंतांना अल्पायुष्याचा शाप असतो. दुष्यंतजीदेखील अवघे ४२ वर्षे जगले. मात्र यातही त्यांनी हिंदीला ललामभूत ठरणार्‍या सृजनाची निर्मिती केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *